मुंबई -महाराष्ट्रात आधुनिक अफजलखानांनी मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. यावरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोट ठेवल्याने सामानातून जुलाब बाहेर पडत आहेत. काळजी करू नका आम्हीच उपचार करू, असे सामनातील टीकेला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काळजी करू नका ; आम्हीच उपचार करू, 'सामना'तील टीकेला संदीप देशपांडेंचे प्रत्युत्तर - News about Sandeep Deshpande
सामनामधील अग्रलेखातून मनसेच्या महाअधिवेशनात अनावरण करण्यात आलेल्या नवीन व जुन्या झेंड्यावर टीका करण्यात आली होती. त्याला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
आजच्या सामनातील अग्रलेखातून मनसेच्या महाअधिवेशनात अनावरण करण्यात राजमुद्रा असलेला मनसेचा नवीन व जुना झेंडा यावर टीका करण्यात आली. हिंदुत्ववादाचा विचार उसना आहे, झेपेल तरच पुढे जा आणि भाजपची नवी खेळी आहे. बाळासाहेबांचे विचार असलेले जुन भाषण व मुद्दे वापरले असल्याची टीका राज ठाकरेंवर करण्यात आली.
यावर देशपांडे म्हणाले की, राज ठाकरे यांनी भाषणात सांगितले आहे. आम्ही कोणाकडे पुरावे देऊ ते. त्यामुळे इतरांनी आम्हांला सांगण्याची आणि आवाहन करण्याची गरज नाही. तर राज्यात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी व पाकिस्तानींचे पुरावे देशाचे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना लवकरच देऊ. उद्धव ठाकरे अयोध्येला कोणत्या तोंडाने जाणार आहेत हा खरा प्रश्न आहे. प्रभू रामांनी विचारले हिंदुत्वाचा मुद्दा का सोडला तर हे काय उत्तर देणार आहेत? असा खोचक टोला देशपांडे यांनी लगावला.