मुंबई-हनुमान चालीसा आंदोलनावेळी ( MNS Hanuman Chalisa Agitation ) मनसे नेते संदीप देशपांडे ( MNS Leader Sandeep Deshpande ) आणि संतोष धुरी ( MNS Leader Santosh Dhuri ) शिवतीर्थावर चकवून दोन्ही नेत्यांनी पळ काढला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेले दादरचे शाखाप्रमुख संतोष साळी ( Santosh Sali ) आणि ड्रायव्हर रोहित वैश्य ( Rohit Vaishya ) यांच्या जामीन अर्जावर 13 मे पर्यंत पोलिसांनी उत्तर सादर करण्यासाठी मुंबई सत्र न्यायालयात आज वेळ मागण्यात आला आहे त्यामुळे आता जामीन अर्जावर पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार आहे.
MNS Hanuman Chalisa Agitation : मनसे शाखाप्रमुख साळी, ड्रायव्हर वैश्यच्या जामिनावर १३ मे रोजी सुनावणी - दादर शाखाप्रमुख संतोष साली
मनसेच्या हनुमान चालीसा आंदोलनावेळी ( MNS Hanuman Chalisa Agitation ) मनसे नेते संदीप देशपांडे ( MNS Leader Sandeep Deshpande ) आणि संतोष धुरी ( MNS Leader Santosh Dhuri ) यांनी पळ काढला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या दादर शाखाप्रमुख संतोष साली ( Santosh Sali ) आणि ड्रायव्हर रोहित वैश्य ( Rohit Vaishya ) यांच्या जामिनावर न्यायालयाने पोलिसांचे म्हणणे मागवले आहे. पुढील सुनावणी १३ मे रोजी होणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांना चकवून दोन्ही नेत्यांनी पळ काढला होता. त्यावेळी महिला पोलीस धक्काबुक्की प्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी, संतोष साळी आणि रोहित वैश्य त्यांच्याविरोधात शिवाजी पार्क पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील प्रमुख आरोपी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी अद्याप पसार असून, त्यांनीदेखील अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. त्यांच्या जामीन अर्जावर 17 मे रोजी सुनावणी होणार आहे.
जामिनासाठी प्रयत्न :मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरु आहेत. एकीकडे देशपांडे यांच्या जामिनासाठी मनसेची विधी सेल कामाला लागली आहे. तर, दुसरीकडे देशपांडे यांच्या शोधासाठी मुंबई क्राईम ब्रांचकडून विशेष पथकं रवाना करण्यात आली आहेत. मुंबईसह उरण, कर्जत भागात या दोघांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. 4 मे रोजी राज ठाकरे यांचं निवासस्थान शिवतीर्थाबाहेर ताब्यात घेण्याचा प्रयत्न असताना देशपांडे आणि धुरी पोलिसांना गुंगारा देत निसटले होते. त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून देशपांडे पोलिसांच्या रडारवर आहेत.
नेमकं काय घडलं? :मुंबईतील शिवाजी पार्क राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. माध्यमांशी बोलणं झाल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेत असल्याचं सांगितलं. त्यावेळी संदीप देशपांडे यांनी आम्ही तुमच्यासोबत येत असल्याचं पोलिसांना सांगितलं. काही अंतर पोलिसांसोबत चालल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे देशपांडे यांच्या खासगी गाडीत बसले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण गाडी न थांबवताच ते तिथून निघून गेले. त्यांची गाडी भरधाव वेगानं जात असताना एक महिला पोलीस जखमी झाली. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी पोलिसांना गुंगारा देत पळ काढल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं खरं. पण पोलिसांनी याप्रकरणी संदीप देशपांडेंवर गुन्हा दाखल केला असून, त्यांचा शोध घेत आहेत. एवढंच नाहीतर संदीप देशपांडेंना शोधण्यासाठी पोलीस राज ठाकरेंच्या शिवतीर्थावरही पोहोचले होते.
हेही वाचा : VIDEO : मनसे नेते संदीप देशपांडे व संतोष धुरी यांना ताब्यात घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न..