मुंबई -हा महाराष्ट्र आहे, तरीही वर आमचे सरकार आहे, महाराष्ट्र केंद्राशी काय संघर्ष करणार? अशी मस्तवाल व महाराष्ट्रविरोधी भाषा राणे वापरतात. महाराष्ट्राच्या अस्मितेची इतकी नाचक्की महाराष्ट्राच्या दुष्मनांनी कधी केली नव्हती. राणे हे 'नॉर्मल' मनुष्य नसल्यानेच त्यांनी महाराष्ट्राला कमी लेखले. भाजपने आता तरी शहाणे व्हावे, असा सल्ला सामन्यातून देण्यात आला आहे.
हेही वाचा -नाशकात भाजपाकडून मुख्यमंत्र्यांविरोधात पोलिसांत तक्रार
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांना अटक झाली होती. अटकेपूर्व जामीन मिळाल्यावर काल राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात शिवसेनेवर शरसंधान साधत, तुम्ही कुणीही माझे काहीही करू शकत नाही. तुम्हा सर्वांना मी पुरून उरलो आहे, असे राणे यांनी ठणकावून सांगितले होते. त्यानंतर राणेंवर आज सामन्यातून उपरोक्त खोचक टीका करण्यात आली.
कुणावरही कसेही बकायचे हा सध्या राजकारण्यांचा धंदा
घरात व दारात भरपूर गांजाची शेती पिकवायची व त्याच गांजाचे सेवन करून कुणावरही कसेही बकायचे, हा सध्या अनेक राजकारण्यांचा धंदा झाला आहे. ही गांजाची शेती कायद्यानेच बंद केली पाहिजे व त्याची सुरुवात केल्याबद्दल महाराष्ट्राची जनता ठाकरे सरकारला धन्यवाद देत असल्याचेही सामन्यात सांगण्यात आले.