मुंबई - राज्य सरकार स्थापन करत असलेल्या SIT विरोधात समीर वानखेडेंची मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात समीर वानखेडे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. अटकेपासून संरक्षण देण्याची याचिकेत प्रमुख मागणी त्यांनी केली आहे. आरोपांचा तपास एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी करत असताना समांतर चौकशीची गरजच काय? असा सवालही यातून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी केला आहे. आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्र दाखल केल्यावर त्यांच्या चौकशीची घोषणा ही राज्य सरकारने केली होती.
- समीर वानखेडेंच्या चौकशीची घोषणा -
आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्र दाखल केले. या प्रतिज्ञापत्रात त्याने धक्कादायक आरोप केले. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला सोडण्यासाठी 25 कोटी रुपयांची डील होणार होती. त्यातले 8 कोटी रुपये समीर वानखेडे यांना मिळणार होते. तसे फोनवरील संभाषण ऐकल्याचा दावा प्रभाकर साईलने केला. याच गंभीर आरोपांची दखल घेत राज्य सरकारने समीर वानखेडे यांच्याविरोधात चौकशीची घोषणा केली आहे. प्रभाकर साईल, ऑड सुधा द्विवेदी, ऑड कनिष्का जयंत आणि नितीन देशमुख यांनी केलेल्या विविध तक्रार अर्जांची एकत्रित चौकशी करण्यासाठी 4 पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक राज्य सरकारकडून जाहीर केली गेली आहे. गेले अनेक दिवस नवाब मलिक विरुद्ध समीर वानखेडे असा सामना उभ्या महाराष्ट्राने पाहिला. आता राज्य सरकारने वानखेडेंविरोधात चौकशी लावल्याने सरकार विरुद्ध वानखेडे असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
- वानखेडेंच्या सुरक्षेत वाढ -