मुंबई -समीर वानखेडेयांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसत आहेत. आता त्यांच्या जात प्रमाणपत्रावरून वानखेडे पुन्हा एकदा अडचणीत येणार आहेत. नवाब मलिक यांनी लावलेल्या आरोपानंतर समीर वानखेडे यांच्या जातीवरून अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर आता मुंबई विभागातील कास्ट सर्टिफिकेट स्क्रुटनी कमिटी समीर वानखेडेंच्या कास्ट सर्टिफिकेटची पडताळणी करणार आहे.
समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार.. आता मुंबई विभागातील कास्ट सर्टिफिकेट स्क्रुटनी कमिटी करणार चौकशी - आर्यन खान
समीर वानखेडे यांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसत आहेत. आता त्यांच्या जात प्रमाणपत्रावरून वानखेडे पुन्हा एकदा अडचणीत येणार आहेत. आता मुंबई विभागातील कास्ट सर्टिफिकेट स्क्रुटनी कमिटी समीर वानखेडेंच्या कास्ट सर्टिफिकेटची पडताळणी करणार आहे.
30 नोव्हेंबरला या प्रकरणावर सुनावणी -
या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांकडून एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. दोन लोकांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर स्क्रुटनी कमिटीने या कास्ट सर्टिफिकेटची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वाभिमानी रिपब्लिक पक्षाचे मनोज संसारे आणि भीम आर्मचे अशोक कांबळे या दोघांच्या तक्रारीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 30 नोव्हेंबरला या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.
त्यामुळे आता समीर वानखेडे यांना लवकरच कास्ट सर्टिफिकेट स्क्रुटनीसमोर हजर रहावे लागणार आहे. त्यानंतर कमिटी सर्व कागदपत्रांची खात्री करून घेण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. तक्रारदारांनी कमिटीकडे समीर वानखेडेंचा निकाहनामा आणि जन्मदाखला सादर करून समीर वानखेडेंचे कास्ट सर्टिफिकेट खोटं असल्याचा दावा केला आहे. तक्रारदारांनी तक्रार करताना म्हटले आहे की, समीर वानखेडे यांचे कास्ट सर्टिफिकेट खोटं आहे. हे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी मुळ तथ्यांमध्ये छेडछाड करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना एस सी कॅटेगिरीमध्ये नोकरी मिळू शकेल, अशी तक्रार त्यांनी दाखल केली आहे. त्यामुळे आता लवकरच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागण्याची शक्यता आहे.