क्रांती रेडकरची दिंडोशी न्यायालयात सोशल मीडियाविरोधात याचिका, 17 डिसेंबरला सुनावणी - क्रांती रेडकरची सोशल मीडियाविरोधात याचिका
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी दिंडोशी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावेळी त्यांनी गुगल, फेसबुक आणि ट्विटर आदि सोशल मीडियावर त्यांच्या कुटुंबांविरोधात होणाऱ्या व्हायरल पोस्टविरोधात याचिका दाखल केली आहे.
मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी दिंडोशी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावेळी त्यांनी गुगल, फेसबुक आणि ट्विटर आदि सोशल मीडियावर त्यांच्या कुटुंबांविरोधात होणाऱ्या व्हायरल पोस्टविरोधात याचिका दाखल केली आहे.
कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर समीर वानखेडे व त्यांच्या कुटुंबावर दररोज सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहेत. यामध्ये प्रमुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनीदेखील अनेकदा सोशल मीडियावर वानखडे कुटुंबांवर पोस्ट केली आहे. मात्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यानंतर नवाब मलिक यांनी सोशल मीडियावर पोस्ट करणे थांबवले होते.
क्रांती रेडकर यांच्या याचिकेत त्यांनी म्हटले आहे की गुगल, फेसबुक आणि ट्विटर या सोशल मीडियाच्या माध्यमातून वानखडे कुटुंबीयांवर खालच्या पातळीत भाषा करणाऱ्या पोस्ट गुगल, फेसबुक आणि ट्विटर यांनी थांबवण्यात यावे आणि त्या काढून टाकाव्यात असा आदेश या सर्व सोशल मीडियाला देण्यात यावा याकरिता याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच न्यायालयाला वानखडे कुटुंबाकडून विनंती देखील करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 17 डिसेंबर रोजी दिंडोशी कोर्टात होणार आहे.