महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ; जात पडताळणी समितीकडून 14 डिसेंबरला उपस्थित राहण्याचे समन्स - Caste Verification Committee

समीर वानखेडे यांचे जातप्रमाणपत्र बनावट (caste verification committee) असल्याचा आरोप करण्यात आला होता. आता या प्रकरणी समीर वानखेडेंना जातपडताळणी समितीसमोर हजर व्हावे लागणार आहे. 14 डिसेंबर रोजी हजर राहण्याचा समन्स समीर वानखेडे यांना जात पडताळणी समितीकडून देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Sameer Wankhede
समीर वानखेडे

By

Published : Dec 1, 2021, 1:21 PM IST

मुंबई -मुंबई एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. समीर वानखेडे यांचे जातप्रमाणपत्र बनावट (caste verification committee) असल्याचा आरोप करण्यात आला होता. आता या प्रकरणी समीर वानखेडेंना जात पडताळणी समितीसमोर ( Caste Verification Committee ) हजर व्हावे लागणार आहे. 14 डिसेंबर रोजी हजर राहण्याचा समन्स समीर वानखेडे यांना जात पडताळणी समितीकडून देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून आज समीर वानखेडे यांच्या जाती प्रमाणपत्र विरोधात आलेल्या तक्रारीची चौकशी सुरु करण्यात आली आहे. अशोक कांबळे या सामजिक कार्यकर्त्यांनी NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याची तक्रार केली होती. तसेच त्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली होती.

या तक्रारीनुसार महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत असलेली जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने तक्रारदाराला पुरावे घेऊन माटुंगा रोड कार्यलयात बोलावले होते. तक्रारदार अशोक कांबळे यांचे वकील नितीन सातपुते यांनी कार्यालयात सर्व कागदपत्र सादर केले असून पुढील सुनावणी 14 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यादिवशी समीर वानखडे यांना देखील बोलवण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.

गेल्या काही दिवसांत मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ( NCP leader Nawab Malik ) आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना दिसून आले. समीर वानखेडे हे भ्रष्टाचारी आणि खंडणीखोर अधिकारी असून त्यांनी अनेक निर्दोष लोकांना खोट्या ड्रग्ज प्रकरणात अडकवल्याचा नवाब मलिक यांचा दावा आहे. तसेच, समीर वानखेडे हे जन्माने मुस्लीम आहेत आणि त्यांनी बोगस जात प्रमाणपत्र सादर करून मागासवर्गीयांच्या आरक्षणात घुसखोरी केली व सरकारी नोकरी मिळवली, असाही दावा नवाब मलिक यांनी केला आहे. तर नवाब मलिक यांचे सर्व दावे समीर वानखेडे यांनी फेटाळले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details