मुंबई -क्रुझ ड्रग्ज पार्टी ( Cruise Drugs Party ) प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ( Aryan Khan Case ) अटक केल्यानंतर या प्रकरणात तत्कालीन तपास करणारे अधिकारी समीर वानखेडे ( Sameer Wankhede ) यांच्यावर अनेक राजकीय नेत्यांसह याप्रकरणातील पंच असलेल्या व्यक्तींनी देखील आरोप केले होते. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी दिल्लीतील एनसीबी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाला एसआयटीची ( Special Investigative Team ) स्थापना करत चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. आता या चौकशी पथकाकडून चौकशी पूर्ण झाले असून अंतिम चौकशीसाठी पुन्हा या प्रकरणाशी संबंधित असलेल्या तिन्ही अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या दिवशी बोलवले आहे.
क्रुज ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीविरोधातील भ्रष्टाचार प्रकरणाचा दक्षता तपास जवळपास पूर्ण झाला आहे. या तपासाच्या शेवटच्या फेरीत पुन्हा एकदा एनसीबीच्या तीन अधिकाऱ्यांना एनसीबी दक्षता पथकाने चौकशीसाठी दिल्लीला बोलावले आहे. दिल्लीतील आयर्न खान ड्रग्ज कनेक्शन प्रकरणातील तत्कालीन तपास अधिकारी समीर वानखेडे, व्ही.व्ही. सिंग आणि आशिष रंजन प्रसाद या तिघांच्या चौकशीची शेवटची फेरी होणार आहे.