मुंबई -समीर वानखेडे यांच्या धर्मांतराच्या वादावर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने क्लिनचीट दिली. मात्र, हा प्रकार संशयास्पद असून वानखेडे जन्मापासूनच मुस्लिम असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी चढवला. तसेच ही धर्म आणि जाती वादाची नव्हे तर फर्जीवाड्याविरोधातील लढाई असल्याचे ते म्हणाले.
'संविधानिक पदाचा मान राखा' -
धर्मांतरावरून होत असलेल्या आरोपांमुळे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची भेट घेतली. जातीसंबंधी कागदपत्रे आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांना दिल्यानंतर संबंधितांचे जातीसंबंधीची कागदपत्र तपासून धर्मांतर केल्याचे दिसून नसल्याचे सांगत क्लिनचीट दिली. तसेच वैयक्तिक आरोप करणे योग्य नसल्याचे मत मांडले. मलिक यावरुन आयोगाला लक्ष केले. समीर वानखेडे जन्मापासून मुस्लिम असून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्षांनी दिलेली क्लीनचीट संशयास्पद असल्याचे म्हटले. तसेच हलदर तुम्ही संविधानिक पदावर आहात त्याचा मान राखा, असे सांगतानाच आयोगाची एक कार्यप्रणाली आहे एखाद्याने तक्रार केली, तर त्याची चौकशी केली पाहिजे व त्याची प्रक्रिया करुन तसा रिपोर्ट संसदेत ठेवून यावर शिफारस मागितली पाहिजे. परंतु तुम्ही माध्यमातून कसे काय सांगू शकता अशी विचारणाही मलिक यांनी केली.