मुंबई -क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यात वाद सुरू असताना आता समीर वानखेडे यांच्या समर्थनात शिवप्रतिष्ठान संघटना मैदानात उतरली आहे. शिवप्रतिष्ठानच्यावतीने समीर वानखेडे यांचा सत्कार करण्यात आला आहे. तसेच नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणीही शिवप्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आली आहे. या सत्काराला विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे.
'ड्रग्ज मुक्त महाराष्ट्रासाठीच वानखेडेंचे प्रयत्न' -
शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी आज मुंबई एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा कार्यालयात सोमवारी सत्कार केला. तसेच वानखेडे यांच्यावर पुष्वृष्टी करत त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा एक फोटो सुद्धा त्यांना भेट दिला. 'ज्याप्रमाणे समीर वानखडे हे ड्रग्ज संदर्भात कारवाई करत आहे. ही सध्याच्या तरुणांना ड्रग्जमधून वाचण्यासाठी समीर वानखडे जे प्रयत्न करत आहे ते चांगला प्रयत्न आहे. ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, जेणेकरून युवकांना यापासून दूर ठेवून चांगला महाराष्ट्र घडवण्यासाठी एक चांगलं काम समीर वानखडे करत आहे. मात्र, काही लोक याला विरोध करत समीर वानखेडे यांच्या विरोधात रोज रोज नव-नवीन आरोप करत त्यांच्या परिवारवर देखील आरोप करत आहे', असे शिवप्रतिष्ठानने म्हटले आहे.
मलिकांच्या राजीनाम्याची मागणी -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवावा. मंत्री महाराष्ट्राचा हिताचा विचार करू शकत नाही, अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळात राहू देऊ नये. अन्यथा शिवप्रतिष्ठानच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करण्यात येईल. जर तरी राज्य सरकारने निर्णय नाही घेतला तर आम्ही नवाब मलिकांंच्या विरोधात कोर्टातदेखील धाव घेऊ आणि महाराष्ट्रातील विविध पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात तक्रार देखील दाखल करु, असे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी सांगितले आहे.
या अगोदरही समर्थन -
समीर वानखेडे व मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद टोकाला पोहोचला असताना समीर वानखेडे यांचा धर्म, जात प्रमाणपत्र, जन्म दाखला, संपत्ती, त्यांचे कपडे, भाजप नेत्यांशी संगनमत असे अनेक आरोप मंत्री नवाब मलिक यांच्याकडून केले गेले आहेत व अद्याप ते सुरूच आहेत. समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ या अगोदर आरपीआय आठवले गट, भाजप ओबीसी, अनुसूचित जमाती मोर्चा हे पुढे येऊन त्यांनीसुद्धा आंदोलन केले आहे. आता शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेने वानखेडे यांना समर्थन दिले असले तरी, जी हे प्रकरण चौकशीच्या फेऱ्यात अडकले असल्याने चौकशीअंती यात दोषी कोण व निर्दोष कोण ते समजणार आहे. तो पर्यंत आरोप, समर्थन चालूच राहणार.
हेही वाचा -राज्यात 'या' तारखेपर्यंत शंभर टक्के लसीकरणाचे मुख्यमंत्र्यांचे उद्दीष्ट, आज पंतप्रधान घेणार आढावा