मुंबई - मी जो काही सर्वात प्रथम जातपडताळणी समितीचा निकाल आला आहे. त्याचे स्वागत, आदर करतो, नवाब मलिकांनी केलेले आरोप या समितीने फेटाळून लावले आहेत. त्यानंतर पूर्वजांचे आणि बाकी दाखल केलेले कागदपत्रे समितीने गृहीत धरले आहेत. Caste Verification of Sameer Wankhede त्याअनुषंगाने गोरेगाव पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989, भारतीय दंड विधान मानहानीचा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे समीर वानखडे म्हणाले आहेत.
खालच्या पातळीची मानसिकता जनतेला दाखवत आहात बहिणीवर केलेल्या खंडणीच्या आरोपांवर बोलताना समीर वानखेडे म्हणाले, या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी एसआयटी नेमली होती. त्यानंतर काय निष्पन्न झाले हे सर्वांना माहिती आहे. Arya Khan drug case त्यानंतर जर कुणी एक बाई आपल्या मुलांबरोबर, कुटुंबासमवेत कुठे फिरण्यासाठी गेलेली आहे. त्याचा हा अर्थ नाही, की ती खंडणीसाठी गेलेली आहे. ही तुमची मानसिकता आहे, खालच्या पातळीची मानसिकता जनतेला दाखवत आहात. दुसरी गोष्ट आता माझी ताई आहे ती प्रॅक्टिसिंग वकील आहे. तिने देखील तक्रार नोंदवलेली आहे. महिला आयोगाकडे तक्रार तिने केली आहे. त्यावर आता कारवाई केली जाईल.
खूप खालच्या पातळीचे आरोप केले नवाब मलिकांच्या जावयाला अटक केली म्हणून तुम्हाला वादात ओढले का, दोन्ही प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत. त्यामुळे त्यावर मी बोलू शकत नाही. दुसरे मी आता एनसीबीमध्ये कार्यरत देखील नाही. मी माझं कर्तव्य बजावलेले आहे. Sameer Wankhede clean chit from caste verification जे काही संविधानाने, विशेष अधिकार अधिकाऱ्यांना किंवा एजन्सीना दिले आहेत, त्यानुसार मी देशसेवा केली आहे. तसे मला काही वाटत नाही. उलट मला जास्त प्रेरणा मिळाली आहे. कारण सत्याचा विजय झाला आहे. सत्यमेव जयते हे मी नेहमी सांगतो. हो, नक्कीच कुटुंबाला त्रास झालाय. कारण या सर्व वादात माझी ताई, माझे वयस्कर वडील, माझी पत्नी यांना देखील ओढले होते. खूप खालच्या पातळीचे आरोप केले होते. इतक्या खालच्या पातळीवर आरोप केले गेले, इतकी खालची पातळी कुणी गाठलेली मी पाहिलेली नाही.