महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

समीर वानखेडे मुस्लिमच; निकाह पढवणाऱ्या मौलानांचा दावा

2006 मध्ये लग्नादरम्यान समीर वानखेडे याने स्वत:ला मुस्लिम असल्याचे सांगितले होते. २००६ साली समीर वानखेडे ह्यांचा शबाना ह्यांचा शी निकाह झाला. निकाहच्यावेळी समीर आणि शबाना दोघेही मुस्लीम धर्मीय होते. जर समीर वानखेडे मुस्लिम नसते तर मी निकाह पढवला नसता, असा दावा मौलाना अहमद यांनी केला.

समीर वानखेडे मुस्लिमच; निकाह पढवणाऱ्या मौलानांचा दावा
समीर वानखेडे मुस्लिमच; निकाह पढवणाऱ्या मौलानांचा दावा

By

Published : Oct 27, 2021, 1:07 PM IST

Updated : Oct 27, 2021, 3:43 PM IST

मुंबई - 2006 मध्ये लग्नादरम्यान समीर वानखेडे याने स्वत:ला मुस्लिम असल्याचे सांगितले होते. २००६ साली समीर वानखेडे ह्यांचा शबाना ह्यांचाशी निकाह झाला. निकाहच्यावेळी समीर आणि शबाना दोघेही मुस्लीम धर्मीय होते. जर समीर वानखेडे मुस्लिम नसते तर मी निकाह पढवला नसता, असा दावा मौलाना अहमद यांनी केला.

समीर वानखेडे मुस्लिमच; निकाह पढवणाऱ्या मौलानांचा दावा

समीर वानखेडेंचा 'निकाहनामा' समोर: 'स्वीट कपल' म्हणत नवाब मलिक यांचं नवीन ट्वीट

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक हे अमली पदार्थ विरोधी पथकाचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांच्या विरोधात अनेक आरोप करत आहेत. यातच त्यांनी आज पुन्हा एकदा नवीन ट्विट करत या आरोपांमध्ये भर टाकली. नवाब मलिक यांनी आज नवीन ट्विट करत समीर वानखडे यांच्या पहिल्या लग्नाचा फोटो त्यांनी ट्विट केला आहे. यासोबतच समीर वानखेडे आणि शबाना कुरेशी यांच्या लग्नाचा निकाहनामा असल्याचाही त्यांनी ट्विट करत दावा केला आहे. या निकाहनामा मध्ये समीर दाऊद वानखडे अशा नावाचा उल्लेख आहे. हे लग्न 6 डिसेंबर 2008 साली झाला असल्याचंही नवाब मलिक यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितला आहे.

नवाब मलिक एकप्रकारे समीर वानखेडेंना धमकावत आहेत, मंगलप्रभात लोढा यांची राज्यपालांकडे तक्रार

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणामध्ये एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर दररोज नवनवीन आरोप करत आहेत. हे आरोप करताना ज्या पद्धतीची भाषा ते वापरत आहेत व ज्या प्रकारे त्यांना धमकावत आहेत, या प्रकरणाची तक्रार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मुंबई भाजप अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे.

माझ्या नावात कोणीतरी छेडछाड केली - ज्ञानदेव वानखेडे

समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडेंनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन जातीचा दाखला प्रसारमाध्यमांना दाखविला. या दाखल्यावर समीर ज्ञानदेव वानखेडे असे नाव असल्याचा उल्लेख असल्याचे ज्ञानदेव वानखेडेंनी सांगितले. यावेळी नवाब मलिक यांच्या आरोपाचे खंडन करत त्यांच्याविरोधात कोर्टात जाणार असल्याचे ते म्हणाले. समीर आणि पहिल्या पत्नीत कायदेशीर घटस्फोट झाल्याचेही ते म्हणाले. कायदेशीर कागदपत्रांमध्ये ज्ञानदेव वानखेडे अशीच नोंद आहे. माझ्या नावात कोणीतरी छेडछाड केली आहे असेही ते म्हणाले.

Last Updated : Oct 27, 2021, 3:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details