मुंबई -राज्यसभेच्या जागेसाठी सहाव्या जागेसाठी शिवसेनेने दावा ठोकल्यानंतर संभाजी राजे ( Sambhaji Raje ) रिंगणात उतरले आहेत. संभाजीराजांनी शिवसेनेच्या चिन्हावर राज्यसभेत ( Rajyasabha Election ) जावे, अटकळ बांधण्यात आली. मात्र संभाजीराजे यांनी शिवसेनेची ऑफर ( Sambhaji Raje Reject Shivsena Offer ) धुडकावून लावत अपक्ष निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. त्यामुळे या निवडीसाठी आता चुरस निर्माण झाली आहे.
राज्य सभेच्या सहाव्या जागेसाठी चुरस -माजी खासदार संभाजीराजे यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याचा निर्णय अगोदरच जाहीर केला. त्यानंतर शिवसेनेचा एकच खासदार निवडून जाणार असताना आणि शिल्लक राहिलेल्या मतांच्या जोरावर आणखी एक उमेदवार उभा कऱण्याची घोषणा केली. तर दुसऱ्याबाजूला संभाजी राजे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली. यापार्श्वभूमीवर संभाजी राजे यांना राज्यसभेची निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी शिवसेनेत यावे आणि त्यानंतर शिवसेना विचार करेल, असे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी स्पष्ट केले. संभाजीराजेंनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संध्याकाळी भेट घेतली. दरम्यान, शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव संभाजी राजे यांच्या पुढे मांडण्यात आला. मात्र, संभाजीराजेंनी कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर निवडणूक न लढवता, अपक्ष उमेदवार राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सहाव्या जागेसाठी चुरस निर्माण होणार असल्याचे दिसून येत आहे.