महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

संभाजी राजे भूमिकेवर ठाम, शिवसेना प्रवेशाची ऑफर नाकारली, राज्यसभेची चुरस वाढली - Sambhaji Raje insisted on the role

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने संभाजीराजे यांना दिलेली ऑफर नाकारली असून अपक्ष लढणार ठाम आहेत. गेल्या काही दिवसांपासून संभाजी राजे शिवसेना प्रवेश करणार अशा चर्चा सुरू होत्या. त्याला आता ब्रेक लागण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यसभेचे निवडणूक अटीतटीची होणार आहे.

संभाजी राजे भूमिकेवर ठाम
संभाजी राजे भूमिकेवर ठाम

By

Published : May 23, 2022, 10:07 AM IST

Updated : May 23, 2022, 10:12 AM IST

मुंबई - राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने संभाजीराजे यांना दिलेली ऑफर नाकारली असून अपक्ष लढणार ठाम आहेत. गेल्या काही दिवसांपासून संभाजी राजे शिवसेना प्रवेश करणार अशा चर्चा सुरू होत्या. त्याला आता ब्रेक लागण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यसभेचे निवडणूक अटीतटीची होणार आहे.


राज्यसभेच्या सहाव्या जागेचे राजकारण शिगेला -राज्यसभेच्या सहाव्या जागेचे राजकारण शिगेला पोहोचले आहेत शिवसेनेने दोन जागा लढवण्याचा निर्धार केला आहे. तर छत्रपती संभाजीराजे देखील इच्छुक आहेत. मात्र संभाजीराजे यांना राज्यसभेवर जाण्यासाठी ४२ मतांची गरज आहे. महाविकास आघाडी सरकारमुळे शिवसेनेचे मताधिक्य पूर्ण होणार आहे. संभाजी राजे आणि शिवसेनेत यावे अशी अट घालण्यात आली आहे. आज दुपारी बारा वाजता संभाजीराजेंना वर्षा निवासस्थानी बोलवण्याचे निमंत्रण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. परंतु संभाजी राजेनी शिवसेनेची ऑफर नाकारल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे संभाजीराजेंची राज्यसभेवर जाण्याची वाट खडतर बनण्याची शक्यता आहे.


दोन्ही वेळची भेट निष्प्रभ -अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम असलेल्या संभाजीराजांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दोन वेळा भेट घेतली. दोन्ही वेळा शिवसेनेकडून संभाजीराजेना सेनेतून राज्यसभेवर जाण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र संभाजीराजे अपक्षरण ठाम आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दोन्ही वेळी घेतलेल्या भेटी निष्प्रभ ठरल्या आहेत.


मराठा संघटनांचा दबाव -संभाजीराजांनी अपक्ष लढणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी त्यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी मराठा संघटनांकडून सुरू आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नेते संजय राऊत आणि एकनाथ शिंदे, काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या मराठा संघटनांकडून भेटीगाठी घेतल्या. महाविकास आघाडी सरकारमधील सर्वांनी शिवसेनेला पाठिंबा दर्शवला आहे. मराठा आमदार देखील शिवसेनेच्या पाठीशी उभे आहेत. मराठा संघटनांकडून यामुळे राजकीय पक्षांवर आगामी निवडणुकांची भीती दाखवत दबाव टाकला वाढवला आहे.

चंद्रकांत खैरेना लॉटरी लागणार? -राज्यसभेच्या सहव्या जागेसाठी शिवसेनेकडून लढण्यास संभाजी राजे आणि नकार दिल्यास, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील, आनंदराव अडसूळ, रामदास कदम आणि काँग्रेसमधून शिवसेनेते प्रवेश केलेल्या उर्मिला मातोंडकर यांची नावे चर्चेत आहेत. खैरे यांच्या मागील लोकसभा निवडणुकीत एमआयएमच्या इमतियाज जलील यांनी पराभव केला होता. या पराभवाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व्यथित झाले होते. हा पराभव केवळ खैरे यांचा नसून माझा पराभव आहे असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे खैरे यांच्या नावाला पसंती असल्याचे शिवसेना गोटातून समजते. त्यापाठोपाठ शिवाजीराव आढळराव पाटील, आनंदराव अडसूळ यांच्याबाबत पक्षांतर्गत विचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे, पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Last Updated : May 23, 2022, 10:12 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details