महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sambhaji Raje Met Fadnavis : संभाजीराजेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, 12 मे रोजी भूमिका स्पष्ट करणार - संभाजीराजे नवीन घोषणा १२ मे

माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली ( Chhatrapati Sambhaji Raje met Devendra Fadnavis ) आहे. संभाजीराजेंच्या खासदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर ( Chhatrapati Sambhaji Raje MP Term End ) ते १२ मे रोजी महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता ( Sambhaji Raje New Announcement ) आहे. त्यापार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

Sambhaji Raje Met Fadnavis
संभाजीराजेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

By

Published : May 10, 2022, 1:10 PM IST

मुंबई-छत्रपती संभाजीराजे यांनी भाजप नेते आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज भेट ( Chhatrapati Sambhaji Raje met Devendra Fadnavis ) घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली. आपल्या खासदारकीचा कार्यकाळ संपल्यामुळे ( Chhatrapati Sambhaji Raje MP Term End ) आपण देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राज्यसभेत खासदार म्हणून आपल्याला पाठवण्यात यावे यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्यामुळेच भारतीय जनता पक्ष पुरस्कृत म्हणून राज्यसभेवर आपण खासदार झालो होतो. त्या खासदारकीचा कार्यकाळ संपल्यामुळे आपण देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याचं भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना छत्रपती संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.

या भेटीदरम्यान राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले. तसेच आपली पुढची राजकीय वाटचाल काय असेल याबाबत आपण 12 मे ला सविस्तर आपली भूमिका सर्वांसमोर मांडणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले ( Sambhaji Raje New Announcement ) आहे.


वेगळा पक्ष स्थापन करणार? :छत्रपती संभाजीराजे यांची खासदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर ते कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. भारतीय जनता पक्षाने त्यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. यासोबतच महाविकास आघाडीत छत्रपती संभाजीराजे यांना घ्यायचा असेल तर, महाविकास आघाडी मधील तिन्ही पक्षाची चर्चा करावी लागेल असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. तसेच भारतीय जनता पक्ष पुरस्कृत खासदार असतानाही महाराष्ट्राच्या हिताच्या प्रश्नासाठी नेहमीच छत्रपती संभाजीराजे यांनी मदत केली असल्याचेही शरद पवारांनी सांगितले आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी राजे कोणत्या पक्षात जाणार? किंवा आपला स्वतंत्र पक्ष निर्माण करणार हे आता 12 मे ला स्पष्ट होईल.

हेही वाचा : SambhajiRaje Chhatrapati : खासदारकीचा शेवट दिवस संभाजीराजेंनी 'या' ठिकाणी केला व्यतीत; म्हणाले...

ABOUT THE AUTHOR

...view details