महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

....साठ वर्षात आपला देश विज्ञान आणि औषधनिर्मिती क्षेत्रांत प्रगतीपथावर पोहचल्याचे हे प्रमाणपत्र - संजय राऊत

जगातील अनेक देशांच्या नेत्यांनी भारताकडे हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या औषधाची मागणी केली. भारतानेही मानवधर्माचे पालन करत या औषधांवरील निर्बंध उठवले.

CM MAHARASHTRA
UDDHAV THACKEARY

By

Published : Apr 11, 2020, 10:31 AM IST

मुंबई - कोरोनावर उपाय, लस, औषधे शोधण्याचे दावे समोर येत असतानाही. जगातील अनेक बड्या राष्ट्रांच्या राष्ट्रप्रमुखांनी भारताकडे क्लोरोक्विन औषधाची मागणी केली. अमेरिका सारख्या महासत्तेने तर धमकी, इशारा यांच्या स्वरुपात या औषधाची मागणी केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील खुल्या मनाने मानवधर्माचे पालन करत या औषधांच्या निर्यातीवरील बंदी उठवली. ही घटना म्हणजे, आपल्या देशाने मागील साठ वर्षांत घेतलेल्या अथक परिश्रमाचे आणि तत्कालीन नेत्यांच्या दुरदृष्टीचे द्योतक आहे., अशा शब्दात सामना अग्रलेखातून नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे समर्थन करण्यात आले.

हेही वाचा...'महात्मा फुले यांचे सत्यशोधक विचारच महाराष्ट्राला पुढे नेतील'

'पॉवरफुल' भयभयीत म्हणून 'थँक यु'

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने औषधांचा पुरवठा सुरू केल्यानंतर मोदींना थँक यु म्हटले. तसेच इस्त्रायल, ब्राझील आदी देशांच्या राष्ट्र प्रमुखांनी देखील भारताचे आभार मानले. त्यावेळी देशातील काही मंडळींना भरते आले. त्यांनी 'जगातीव मोठ मोठ्या राष्ट्रांनी आम्हाला कसे थँक यु म्हटले. देशाची प्रतिष्ठा आणि ताकद किती वाढली आहे' असा प्रचार करण्यास सुरुवात केली. मात्र, हे सर्व 'पॉवरफुल' देश फक्त कोरोनामुळे भयभीत झाले आहेत. सध्या तरी हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन हेच औषध कोरोनावर परिणामकारक ठरत असल्याने याचा पुरवठादार असलेल्या भारतासोबत सख्य राखणे भाग असल्याने भारताला थँक यु म्हटले असल्याचा टोला सामना अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

हेही वाचा...'किरीट सोमय्या ही उपद्रवी प्रवृत्तीची व्यक्ती'

ABOUT THE AUTHOR

...view details