मुंबई - कोरोना संकट काळात रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने देशातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे रासायनिक खतांचे वाढलेले दर केंद्र सरकारने कमी करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी केंद्रीय खत व रसायन मंत्री सदानंद गौडा यांना खत दरवाढीच्या विरोधात पत्र लिहिले आहे.
शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांना लिहून खतांच्या दरात 15 ते 17 टक्के वाढ झाल्याचे नमूद केले आहे. खतांची किंमत कमी व्हावी, अशी मागणी पत्रातून केली आहे.
'खतांच्या दरवाढीचा निर्णय मागे घ्या', शरद पवारांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र - शरद पवारांचे केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांना पत्र
रासायनिक खतांचे वाढलेले दर केंद्र सरकारने कमी करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी केंद्रीय खत व रसायन मंत्री सदानंद गौडा यांना खत दरवाढीच्या विरोधात पत्र लिहिले आहे.
पवारांनी पत्रात लिहिले आहे, की देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका सर्व स्तरांना बसला आहे. यातून शेतकरीही वाचलेला नाही. तोंडावर आलेल्या मान्सूनमुळे शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीची कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे पाऊस पडताच पेरणीची कामे सुरू होतील. मात्र कोरोनाचा फटका बसलेल्या शेतकऱ्याला खताच्या वाढत्या किमतीचा ही फटका बसणार आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार खतांवर 15 ते 17 टक्के पर्यंत किंमत वाढली आहे. याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसतोय. त्यामुळे रसायन व खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी या मुद्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन, खताच्या किंमत कमी करण्याबाबत विचार करावा, अशी मागणी शरद पवार यांनी डी. व्ही. सदानंद गौडा यांच्याकडे मागणी केली आहे.
TAGGED:
ncp leader sharad pawar