मुंबई - पनवेल फॉर्महाऊसच्या शेजाऱ्यासोबत चाललेला वाद अभिनेत्याला भारी पडण्याची चिन्ह दिसत आहेत. या प्रकरणात सुरु असलेल्या केसमुळे आता सलमानच्या अडचणी वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे. (Salaman Khan Panvel farmhouse) केतन कक्कड या शेजाऱ्याने जमिनीसंदर्भात सलमानवर जे आरोप केले होते त्यामध्ये तथ्य असल्याचे मुंबईच्या सिव्हिल कोर्टाने हे मान्य केले आहे. त्याचा कुठलाही आरोप खोटा नाही. त्यामुळे कोर्टाने सलमानने शेजाऱ्याविरोधात केलेल्या मानहानीच्या दाव्याला रद्दबातल केले आहे.
जमिनीच्या प्लॉटवर येण्यास मनाई केली - सलमानने दावा केला होता की, हे आरोप त्याची फक्त माझी बदनामी करण्यासाठी केले जात आहेत. परंतु, कोर्टाने केतनने जे पुरावे सादर केले होते त्यांच्या आधारावर सलमानचे म्हणणे खोटे होते असे मान्य केले आहे. (Injunction Application) सलमानचा शेजारी तक्रारदार केतनने सलमानविरोधात जमिनीसंदर्भातले पुरावे सादर करताना म्हटले होते, की त्याला जमिनीच्या प्लॉटवर येण्यास मनाई केली आहे.
सलमान खान स्वतःची बाजू पूर्णपणे मांडण्यात अयशस्वी - मुंबई सेशन कोर्टाचे न्यायाधीश ए.एच. लद्दाद म्हणाले, की सलमान खान स्वतःची बाजू पूर्णपणे मांडण्यात अयशस्वी ठरला आहे. ती जमिन सलमाननचीच आहे हे त्याला पूर्ण सिद्ध करता आले नाही. कक्कडने मात्र जे पुरावे सादर केले ते त्याच्या म्हणण्याला खरे ठरवत आहेत. (Salman Khan Defamation Case) त्याचसोबत सलमानने त्याचा शेजारी केतन कक्क्डविरोधात कोर्टाकडे 'न्यायालयीन मनाई हुकूम'साठी परवानगी मागितली होती त्यालादेखील कोर्टाने रद्द केले आहे.