मुंबई -ज्ञानवापी प्रकरणावरील चर्चेदरम्यान प्रेषित महंमद पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी मुंबई पोलीस लवकरच भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मायांना समन्स पाठवणार आहेत. याबाबत जबानी नोंद घेण्यात येणार आहेत. अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिली आहे. त्यामुळे नुपूर शर्मा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तर सलमान खान धमकी प्रकरणाचा तपास गांभीर्याने सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी ( Sanjay Pandey on Salman Khan threat case ) सांगितले.
भाजपने शर्मायांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केल्यानंतर आता मुंबई पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. शर्माया भाजपच्या प्रवक्त्या होत्या. ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावर एका खासगी वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान शर्मा यांनी प्रेषित पैगंबरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावर मोठा वाद निर्माण झाला असून जगभरातील अनेक मुस्लिमबहुल देशांचा याचा निषेध केला आहे. त्यानंतर भाजपने शर्मा यांना रविवारी पक्षातून निलंबित केले.
सलमान खान धमकी प्रकरणाचा तपास गांभीर्याने सुरू -अभिनेता सलमान खानला आलेल्या धमकीचा विषय जेवढा गंभीर आहे, तेवढ्याच गांभीर्याने पोलीस तपास करत आहेत. मुंबईत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. गरज पडली तर आम्ही पोलीस सुरक्षा वाढवू. धमकीच्या पत्रात जो मजकूर आहे. त्यावर पोलीस तपास सुरू आहे असा खुलासा मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी केला आहे.