मुंबई -बॉलीवूड अभिनेता सलमान खानचे ( Bollywood actor Salman Khan ) चाहते संपूर्ण जगभरामध्ये आहे. अशातच शुक्रवारी सलमान खान मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात ( Mumbai Police Commissioner's Office ) काही कामानिमित्त आले होते. त्यावेळी सेल्फीसाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी सलमान खान भोवती वेढा घातला. सलमान खानी ने शुक्रवारी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर ( Vivek Phansalkar ) यांची भेट घेण्याकरिता आयुक्त कार्यालयात आले होते. त्यावेळी भेट घेऊन जात असताना आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सलमान खान भोवती सेल्फी काढण्याकरिता मोठ्या प्रमाणात गर्दी केली. ज्याप्रमाणे सर्वसामान्य लोकांना सेल्फीचा मोह असतो त्याचप्रमाणे खाकीतील पोलीस कर्मचाऱ्यांचा मोह देखील या निमित्ताने दिसून आला आहे.
Salman Khan : पोलीस आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांची सलमानसोबत सेल्फी घेण्यासाठी झुंबड - Salim Khan
सलमान खान ( actor Salman Khan ) मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात ( Mumbai Police Commissioner's Office ) काही कामानिमित्त आले होते. त्यावेळी सेल्फीसाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी सलमान खान भोवती वेढा घातला.
प्रकरणाचा गांभीर्याने तपास -सलमान खान यांचे वडील सलीम खान ( Salim Khan ) मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर खानच्या गार्डला हे पत्र सापडले होते. सलमान खान लवकरच तू सिद्धू मूसवालासारखा होशील असे धमकीच्या पत्रात लिहिले होते. या प्रकरणी मुंबईच्या वांद्रे पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता. पोलिसांनी भादंवि कलम 506 अन्वये गुन्हा दाखल केला होता. सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर सलमानला धमकीचे पत्र मिळाल्यानंतर संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत सातत्याने अपडेट्स येत आहेत याप्रकरणी पोलीसही आता अलर्ट मोडमध्ये असून या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत.
हेही वाचा -Lingya Ghat : लिंग्या घाटातील सुळक्यावर चढून पर्यटकांचा जीवघेणा फोटोशूट