मुंबई- पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाल्यानंतर अभिनेता सलमान खानची घराभोवती ( Salman Khan threat letter case ) सुरक्षा वाढविण्यात आली आहे. प्रत्यक्षात आपल्याला कोणत्याही व्यक्तीकडून धमकी किंवा तसा फोन आला नसल्याचे अभिनेता सलमान खानने ( Salman Khan on threat ) पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले आहे. तसेच नुकताच कोणत्याही व्यक्तीबरोबर वाद नसल्याचेही अभिनेता सलमान खानने पोलिसांना सांगितले आहे.
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती. त्यानंतर अभिनेता सलमान खान ( Mumbai Police at Salman Khan house ) आणि त्यांचे वडील लेखक सलीम खान यांना जिवे मारण्याची ( Salman khan Death threat news ) धमकी देण्यात आली. यामुळे त्यांचा सुरक्षेचा ( Mumbai Police team at Salman Khans house ) प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर सलमान खानच्या घरी मुंबई पोलिसांचे पथक दाखल झाले आहे. सुरक्षेविषयी माहिती घेण्यासाठी हे पथक त्यांच्याकडे आले होते. सलमान यांचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले होते, त्यानंतर आता सलमान खान ( Security Salman Khan house Mumbai ) यांची सुरक्षा अजून वाढवण्याची तयारी असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
धमकी मिळाल्याचा सुत्रांनी केला होता दावा-सलमान खानचे वडील सलीम खान हे सकाळी फिरण्यासाठी गेले होते. जेथे ते बाकड्यावर बसले होते, तिथे त्यांना एक पत्र सापडले होते. त्यामध्ये 'सिद्धू मुसेवालाप्रमाणे तुमची हत्या करण्यात येईल,' असे लिहले आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ( Salman Khan Letter Threatening To Kill ) आहे.