महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Salman Khan : मुंबई पोलिसांकडे सलमानचा शस्त्र परवान्यासाठी अर्ज; संघर्ष संघटनेने केला विरोध - Salman Khan Arms License Application

मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाल्यानंतर सलमानने मुंबई पोलिसांकडे शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला आहे. त्यानंतर शस्त्र परवाना न देण्याबद्दल संघर्ष नावाच्या संघटनेने ( Sangharsh Organization ) मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे.

Salman Khan
संघर्ष, संघटनेचे अध्यक्ष पृथ्वीराज मस्के यांची प्रतिक्रिया

By

Published : Jul 26, 2022, 4:06 PM IST

मुंबई - सलमान खानला ( Salman Khan ) शस्त्र परवाना न देण्याबद्दल संघर्ष नावाच्या संघटनेने ( Sangharsh Organization ) मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. या पत्रात सलमानचा यापूर्वी गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याचे म्हटले आहे. हिट अँड रन प्रकरणापासून ते पत्रकाराशी झालेल्या गैरवर्तनाच्या घटनेपर्यंत अनेक घटनांचा उल्लेख त्यांनी पत्रात केलेला आहे. मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाल्यानंतर सलमानने मुंबई पोलिसांकडे शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला आहे.

संघर्ष, संघटनेचे अध्यक्ष पृथ्वीराज मस्के यांची प्रतिक्रिया

शस्त्र परवान्याला सामाजिक संस्थेकडून विरोध - बॉलीवूड अभिनेता सलमान खानने परवानाधारक शस्त्रासाठी केलेल्या अर्जाला विरोध सुरू झाला आहे. मुंबईतील एका सामाजिक संस्थेने मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून परवाना न देण्याची मागणी केली आहे. नुकतेच बॉलिवूड अभिनेता सलमान खानने मुंबई पोलिसांच्या सीपींची भेट घेतली. सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमक्या मिळाल्यानंतर ही भेट झाली. परवानाधारक शस्त्रासाठी सलमान खानने अर्ज केला आहे. मुंबईतील ‘संघर्ष’ या सामाजिक संस्थेने याला विरोध केला. संघटनेचे अध्यक्ष पृथ्वीराज म्हशके यांनी सांगितले की, सलमान खानवर अनेक खटले असून तो आक्रमक मनाचा आहे. अशा स्थितीत त्यांना परवाना देणे योग्य नाही.

सलमान खानला आलेल्या धमकीसंदर्भात जाणून घेतले : आयुक्तांनी त्याच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, त्याला कोणत्या प्रकारच्या धमक्या आल्या आहेत आणि त्यानंतर सलमान खानला त्याच्या सुरक्षेबद्दल माहिती देण्यात आली. गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याच्याकडून नुकतीच सलमान खानला धमकी मिळाली होती. या वेळी सलमान आणि त्याचे वडील सलिम खान यांची चौकशी झाली होती. दरम्यान पोलिस आयुक्तांसोबतची ही भेट त्यासंदर्भात आहे का? की सदिच्छा भेट आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही.

पत्रात सिद्धु मुसेवालाप्रमाणे हत्या करण्याची धमकी : सलीम मॉर्निंग वॉकनंतर ज्या ठिकाणी बसायला जातात तिथे सलीम खान यांच्या गार्डला हे पत्र सापडले. सलमान खान लवकरच तू सिद्धू मूसवालासारखा होशील, असे धमकीच्या पत्रात लिहिले होते. या प्रकरणी मुंबईच्या वांद्रे पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता. पोलिसांनी भादंवि कलम 506 अन्वये गुन्हा दाखल केला होता. सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर सलमानला धमकीचे पत्र मिळाल्यानंतर संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत सातत्याने अपडेट्स येत आहेत. याप्रकरणी पोलीसही आता अलर्ट मोडमध्ये असून, या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने तपास करीत आहेत.

हेही वाचा - Salman Khan Meet Mumbai CP : अभिनेता सलमान खान मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या भेटीला; बंदुकीच्या परवान्यासाठी केला अर्ज

ABOUT THE AUTHOR

...view details