मुंबई :माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुखला मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दिलासा (Salil Deshmukh Mumbai Sessions Court Relief) दिला आहे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात (Salil Deshmukh Financial Misappropriation Case) विशेष पीएमएलए कोर्टासमोर हजर राहण्याकरिता चार आठवड्याची मुदत मिळण्याकरिता दाखल केलेला अर्ज सत्र न्यायालयाने स्वीकारला आहे. (Latest News from Mumbai)
Salil Deshmukh Court Relief : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा सलिल देशमुखला सत्र न्यायालयाचा दिलासा - सलील देशमुख आर्थिक गैरव्यवहार प्रकरण
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुखला मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दिलासा (Salil Deshmukh Mumbai Sessions Court Relief) दिला आहे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात (Salil Deshmukh Financial Misappropriation Case) विशेष पीएमएलए कोर्टासमोर हजर राहण्याकरिता चार आठवड्याची मुदत मिळण्याकरिता दाखल केलेला अर्ज सत्र न्यायालयाने स्वीकारला आहे. (Latest News from Mumbai)
सलील देशमुखांना दिलासा-आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडी कडून दाखल करण्यात आलेल्या खटल्यामध्ये सलील देशमुख आरोपी क्रमांक 17 असल्याचे ईडीच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या आरोप पत्रानंतर विशेष पीएमएलए कोर्टामध्ये आरोप निश्चित करण्यात आले त्यावेळी सलील देशमुखला आरोपी क्रमांक 17 या क्रमावर ठेवण्यात आले होते. सलील देशमुख यांचे या प्रकरणात चौकशी करण्याकरिता केळीच्या वतीने दोन वेळा समान पाठवण्यात आला होता. मात्र दोन्हीही वेळा सलिल देशमुख ईडी कार्यालयात गेले नव्हते. त्यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी ईडी कार्यालयात जाऊन या प्रकरणातील संबंधित ईडीच्या वतीने मागवण्यात आलेले सर्व डॉक्युमेंट ईडी अधिकाऱ्यांना देण्यात आले होत. आता या प्रकरणात कोर्टासमोर हजर राहण्याकरिता चार आठवड्याची मुदत मागण्यात आली होती. ही मुदत विशेष पी एम एल ए कोर्टाने मंजूर केली असल्याने अनिल देशमुख यांच्यासह त्यांच्या मुलाला मोठा दिलासा मिळाला आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृहमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे.