मुंबई -मोबाईल हा मानवाचा अभिवाज्य भाग बनला आहे. अनेकदा मोबाईल हरवल्यानंतर तो परत मिळण्याची शक्यता कमी असते. ही शक्यता साकीनाका पोलिसांनी खोडून काढली आहे. तब्बल 170 हरवलेले मोबाईल साकीनाका पोलिसांनी परत केले आहे.
वर्षभरात 600 मोबाईल हरवल्याच्या तक्रारी
ज्याप्रकारे मोबाईल चोरी होतात त्याच्यावरही आमचे काम सुरू आहे. आम्ही जे मोबाईल हरवल्याचा तक्रारी दाखल करतो. त्यावरही काम सुरू आहे. साकीनाका पोलिस ठाण्यात वर्षभरात 600 मोबाईल हरवलेल्याच्या तक्रारी दाखल झाल्या. त्यापैकी 170 मोबाईल आम्ही परत केले आहे. 'अनेक महत्वाच्या गोष्टी मोबाईलमध्ये असतात. यामुळे आम्ही मोबाईल शोधण्यासाठी प्राधान्य दिले. नागरिकांनी महत्वाची माहिती मोबाईलमध्ये ठेवू नये. त्याचा दुरुपयोग होऊ शकतो' असे परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्तचे डॉ. महेश्वरी रेड्डी यांनी सांगितले.
हेही वाचा -आरोग्य विभागाच्या परीक्षेचा गोंधळ: रोहित पवार 'न्यासा'वर संतापले, ट्वीटमध्ये म्हणाले...