महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sadguru Meet to CM : "माती वाचवा" अभियानासाठी सद्गुरूंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट - Aditya Thackeray

सदगुरू जग्गी वासुदेव (Sadguru) यांनी माती संवर्धनासाठी "माती वाचवा" हे अभियान (Save the Soil Campaign)सुरू केले आहे. या अभियानांतर्गत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची वर्षा निवासस्थानी (Varsha Residence) भेट घेतली. यावेळी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray), पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), राघवेंद्र शास्त्री व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

Sadguru Jaggi Vasudev called on the Chief Minister
सदगुरू जग्गी वासुदेव यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

By

Published : Jun 13, 2022, 12:46 PM IST

मुंबई : ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सदगुरू जग्गी वासुदेव (Sadguru Jaggi Vasudev) यांनी मातीचा होणारा ऱ्हास लक्षात घेता त्याच्या संवर्धनासाठी "माती वाचवा" ही मोहीम सुरू केली आहे. याच मोहिमेंतर्गत सद्गुरूंनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन 'माती वाचवा' या आपल्या जागतिक मोहिमेची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या या मोहिमेला शुभेच्छा देताना पर्यावरण संवर्धनासाठी राज्यात सुरू असलेल्या विविध उपक्रमांविषयाही सांगितले.

आदित्य ठाकरेंनी जाणून घेतला प्रवास : यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील सद्गुरू जग्गी यांच्याकडून मोहिमेदरम्यान आलेले अनुभव जाणून घेतले. तसेच, पर्यावरण संवर्धनासाठी राज्यात व्यापक स्तरावर काम सुरू आहे, असे सांगितले. मुख्यमंत्री यांच्या शासकीय निवास्थानी वर्षां बंगला यथे 12 जून सायंकाळी भेट घेतली. या भेटीच्या वेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, राघवेंद्र शास्त्री व त्यांचे सहकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यानी त्यांना मातीची गुणवत्ता तसेच संवर्धन करण्यासाठी सुरू असलेल्या या मोहिमेला महाराष्ट्राचा पाठिंबा असल्याचेही सांगितले.

माती संवर्धनासाठी सद्गुरूंची मोहीम : मातीचा होणारा ऱ्हास लक्षात घेता त्याच्या संवर्धनासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी सदगुरू जग्गी वासुदेव यांनी ही मोहीम सुरू केली असून, आतापर्यंत 27 देशांमधून 25,000 किमीची यात्रा त्यांनी पूर्ण केली असून, देशातल्या 5 राज्यांतून फिरत ते महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. त्यांच्या या मोहिमेत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील कौतुक केले असून, याबाबत ते करीत असलेली जनजागृती अत्यंत महत्त्वाची आहे. मातीशी असलेली माणसाची नाळ मी कधीही तोडू शकत नाही. त्यामुळे त्यांनी सुरू केलेले अभियान हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत आदित्य ठाकरे यांनीदेखील व्यक्त केले आहे.

हेही वाचा : मुळा मुठा नदी पुनरुज्जीवनाचा प्रश्‍न लवकरच सुटणार - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

ABOUT THE AUTHOR

...view details