मुंबई - राज्यात 20 जूनला विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी निवडणुक ( Legislative Council elections ) पार पडणार आहे. या निवडणुकीत महाविकास ( Mahavikas Aghadi candidates ) आघाडीकडून 6 उमेदवार भारतीय जनता ( BJP candidates ) पक्षाकडून 5 उमेदवार रिंगणात मौदानात उतरणार आहे. भारतीय जनता पक्षाकडून प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय यांनी उमेदवारी देण्यात येणार आहे. तर, महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप, चंद्रकांत हांडोरे, राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर, एकनाथ खडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच शिवसेनेकडून आमशा पाडवी, सचिन अहिर यांची नावे जाहीर करण्यात आली आहे.
तसेच अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे घेतला आहे.
महाविकास आघाडी चिंतेत -राज्यसभा निवडणुकीमध्ये अनपेक्षित निकाल आल्यामुळे महाविकास आघाडी ( Maha vikas Aghadi ) चिंतेत आहे. तर, भारतीय जनता पक्षाचा (BJP) आत्मविश्वास बळावला आहे. त्यातच 20 जूनला होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस (Congress) आणि शिवसेनेकडून प्रत्येकी दोन उमेदवार देण्यात आले आहेत. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पाच उमेदवार रिंगणात आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीत दहा जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात असणार आहेत. आज विधान परिषदेच्या निवडणुकीत ( Legislative Council candidature application ) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. यावेळी सदाभाऊ खोत यांनी निवडणुक रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे, विधान परिषदेचा ( Legislative Council election 2022 ) देखील आखाडा राज्यसभा निवडणुकीप्रमाणे रंगणार का? याकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले आहे.