मुंबई - तत्कालीन फडणवीस सरकारमधील अनेक प्रकरणांची चौकशी करण्यात येत आहे. फडणवीस, दरेकर, बावनकुळे यांच्या कितीही चौकशी लावा. दरोडे तुम्ही टाकलेत त्यामुळे आतही तुम्हीच जाणार, असा इशारा भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी दिला. विधानभवनात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
Sadabhau Khot : 'तुम्ही दरोडे टाकलेत, आतही तुम्हीच जाणार' - सदाभाऊ खोत यांचा इशारा - सदाभाऊ खोत यांचा इशारा
राज्यातील वीज प्रश्नावर सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. विधिमंडळात शेतकऱ्यांना दिलासा देणार असल्याचे ऊर्जामंत्र्यानी सांगितले. मात्र जेवायला बोलवायचे आणि ताटात काय, अशी स्थिती आहे. कोरोना काळात शेतकरी संकटात होता. त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने त्यांचे वीज बिल माफ करायला हवे.
राज्यातील वीज प्रश्नावर सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. विधिमंडळात शेतकऱ्यांना दिलासा देणार असल्याचे ऊर्जामंत्र्यानी सांगितले. मात्र जेवायला बोलवायचे आणि ताटात काय, अशी स्थिती आहे. कोरोना काळात शेतकरी संकटात होता. त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने त्यांचे वीज बिल माफ करायला हवे. सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणार नाही, परंतु वीज तोडायला पहिला येईल, असा आरोप खोत यांनी केला.
राज्य सरकारने समिती नेमून या खात्याच्या मागील पाच वर्षांचे चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या सत्ता काळात शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. एक रुपया वसूल केला नाही, मग तुम्ही काय करताय? सरकारने शेतकर्यांची घोर फसवणूक केली आहे. राज्यातील शेतकरी संतप्त झाला असून एक दिवस सरकारवर नांगर फिरवल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा खोत यांनी दिला.