महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MLC Election 2022 : सदाभाऊ खोत यांचा उमेदवारी अर्ज मागे; म्हणाले, 'गड्या आपला गावच बरा' - सदाभाऊ खोत यांचा उमेदवारी अर्ज मागे

भाजपाचे ( BJP ) सहावे उमेदवार सदाभाऊ खोत ( Sadabhau Khot candidature application withdrawn ) यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. पक्षाच्या सांगण्यावरून आपण उमेदवारी मागे घेतली असून आपण नाराज नाही. मात्र आपला गावच बरा, अशी प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.

सदाभाऊ खोत
सदाभाऊ खोत

By

Published : Jun 13, 2022, 4:19 PM IST

मुंबई -विधान परिषदेच्या निवडणुकीत आता अकरा उमेदवार रिंगणात आहेत. भाजपाचे ( BJP ) सहावे उमेदवार सदाभाऊ खोत ( Sadabhau Khot candidature application withdrawn ) यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. पक्षाच्या सांगण्यावरून आपण उमेदवारी मागे घेतली असून आपण नाराज नाही. मात्र आपला गावच बरा, अशी प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. भाजपाचे 5 उमेदवार रिंगणात असून हे सर्व उमेदवार विजयी होतील, असा दावा सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला आहे.


'पक्षाचा आदेश महत्त्वाचा' :पक्षाने आदेश दिल्यामुळे आपण आपली उमेदवारी मागे घेत आहे. या उमेदवारीमुळे आता आमच्या पाच जागा शिल्लक राहतात आणि या पाचही जागा निवडून येतील. मला पक्षाने संधी दिली माझ्यावर विश्वास टाकला याबद्दल मी पक्षाचा आभारी आहे. मात्र मी तळागाळातला आणि मातीत काम करणारा कार्यकर्ता आहे. यापूर्वीही अनेकदा मंत्रिपदासाठी माझे नाव घ्यायचे आणि दूर जायचे. मला त्याची सवय असून गड्या आपला गाव बरा, आपली माती आणि आपली माणसे बरी, अशी प्रतिक्रिया खोत यांनी यावेळी व्यक्त केली.

हेही वाचा -Nana Patole : 'ब्रिटीशांप्रमाणे केंद्रातील सरकार...'; राहुल गांधींच्या ईडी नोटीसवरुन पटोलेंची भाजपावर टीका

ABOUT THE AUTHOR

...view details