मुंबई - एनआयएने जप्त केलेली बनेली स्पोर्ट्स गाडी सचिन वाझेही चालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सचिन वाझेंनी याच बाईकवरून लॉंग ड्राईव्ह केले होते. सचिन वाझे एका व्हिडिओत एका बाईक रायडर टीम सोबत बनेली स्पोर्ट्स चालवताना दिसत आहेत. हा व्हिडिओ चार वर्षांपूर्वी युट्युबवर पोस्ट करण्यात आला होता.
दमणमधून ही बाईक एनआयएने जप्त केली असून ही स्पोर्टस बाईक बेनेली कंपनीची आहे. या स्पोर्टस बाईकची किंमत जवळपास ८ लाखांच्या घरात असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी एनआयएने मीना जॉर्ज यांना ताब्यात घेतले होते. ही बाईक त्यांच्याच मालकीची आहे. ट्रायडंट हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मीना जॉर्ज सचिन वाझे यांच्यासोबत दिसून आल्याचे सांगितले जाते. त्यावेळी त्यांच्या हातात पैसे मोजण्याचे मशीन होते, असेही सांगितले जाते.