महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सचिन वाझे कोणाकडून पैसे वसूल करत होते; राम कदम यांचा सवाल - आमदार राम कदम

सचिन वाझे प्रकरणात एनआयएने मर्सिडीझ कार जप्त केली आहे. या कारमध्ये एनआयएला नोटा मोजण्याची मशीन आणि पाच लाख रुपये कॅश सापडली आहे, अशी माहिती एनआयएने दिली आहे.

सचिन वाझे कोणाकडून पैसे वसूल करत होते; राम कदम यांचा सवाल
सचिन वाझे कोणाकडून पैसे वसूल करत होते; राम कदम यांचा सवाल

By

Published : Mar 17, 2021, 10:38 PM IST

मुंबई - सचिन वाझे प्रकरणात एनआयएने मर्सिडीझ कार जप्त केली आहे. या कारमध्ये एनआयएला नोटा मोजण्याची मशीन आणि पाच लाख रुपये कॅश सापडली आहे, अशी माहिती एनआयएने दिली आहे. त्यावरून आत्ता भाजपचे आमदार राम कदम यांनी सवाल उपस्थित केला आहे की, सचिन वाझे हे कोणाकडून पैसे गोळा करण्याच काम करत होते? या सगळ्या प्रकरणावरून सध्या राज्याचं वातावरण खूप तापलं आहे. मुख्यमंत्री बैठका घेत आहेत. या बैठका कोणासाठी घेत आहेत, असा सवाल देखील आमदार राम कदम यांनी उपस्थित केला आहे.

सचिन वाझे कोणाकडून पैसे वसूल करत होते; राम कदम यांचा सवाल

एनआयएच्या हाती काहीतरी सबळ पुरावे-

स्फोटके बाळगणे त्याचबरोबर अंबानी यांच्या बंगल्याशेजारी स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीला पार्क करण्याच्या गुन्ह्यात महत्त्वाची भूमिका असण्याच्या आरोपाखाली पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना बेड्या ठोकण्यात आल्या. एनआयएच्या हाती काहीतरी सबळ पुरावा लागल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

काय घडले होते-

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर 25 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आली होती. या परिसरातली सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर 24 फेब्रुवारीला रात्री साधारण एक वाजता अंबानींच्या घराबाहेर दोन गाड्या आल्या होत्या. यापैकी स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके होती. ही गाडी पार्क केल्यानंतर चालक गाडीतून खाली उतरला होता. त्यानंतर मागून एक इनोव्हा कार आली त्यामध्ये बसून तो निघून गेला होता.

हेही वाचा-बापरे! राज्यात बुधवारी 23 हजार 179 नवे कोरोनाग्रस्त

ABOUT THE AUTHOR

...view details