मुंबई -100 कोटी कथित वसुली प्रकरणी चांदिवाल आयोगासमोर आज तिसऱ्या दिवशी पुन्हा सचिन वाझेची ( sachin waze cross examination ) अनिल देशमुख यांच्या वकिलांकडून उलट तपासणी करण्यात आली. यावेळी सचिन वाझे याला अनिल देशमुख यांनी तुम्हाला बार आणि रेस्टॉरेंटकडून वसुली करण्याचे सांगितले होते का? हा प्रश्न करण्यात आला, त्यावर वाझेने आठवत नाही असे उत्तर दिल्याने सर्वचजण बुचकळ्यात पडले.
हेही वाचा -Saamana Editorial On Rahul Gandhi : राहुल गांधींना हिंदूत्वाचा दिवा पेटविता आला तर स्वागतच - सामना
चांदिवली आयोगाचे कामकाज 21 डिसेंबर पर्यंत तहकूब करण्यात आले आहे. अनिल देशमुख यांच्या वकिलांकडून सचिन वाझेला विचारण्यात आलेले प्रश्न पुढील प्रमाणे आहेत.
प्रश्न १. आपण क्राईम इंटेलिजन्स यूनिट ( ciu ) मध्ये ज्या केसचा तपास केला त्या केसमध्ये आरोपपत्र दाखल झाल आहे का?
उत्तर - माझ्या काळातील सर्व केसमध्ये आरोपपत्र दाखल केले आहेत.
प्रश्न २. ज्या केसमध्ये आपण आरोपपत्र दाखल केलेत, त्या केसेसमध्ये आपण वरिष्ठांच्या हस्तक्षेपाशिवाय आरोपपत्र दाखल केलेत का?
उत्तर - हो.
प्रश्न ३. राजकीय व्यक्तींच्या आदेशाशिवाय, त्यांच्या आदेशाची दखल न घेता आरोप पत्र दाखल केले होते का?
उत्तर - कोणत्याही राजकीय व्यक्तींनी माझ्या तपासत हस्तक्षेप केला नाही.
प्रश्न ४. याचा अर्थ कोणत्याही सत्ताधारी व्यक्तीने तुमच्या तपासत हस्तक्षेप केला नाही?
उत्तर - हो.
प्रश्न ५. हे आरोपपत्र सादर करताना कोणत्याही प्रकारचा गृह मंत्रालयातून काही संबंध होता का?
उत्तर - नाही.
प्रश्न ६. इतर कामात गृहमंत्रालयातून कधी ढवळाढवळ झाली होती का? तुम्हाला कधी पैशाबाबत ऑफर केली का?
उत्तर - नाही.
प्रश्न ७. कधी गृहमंत्री यांना पैसे द्यायची वेळ आली होती का?
उत्तर - नाही. माझ्यातर्फे नाही.
प्रश्न ८. तुम्ही कधी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पैसे दिलेत का?