मुंबई - मुंबईतील मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपी सचिन वाझे याला शनिवारी एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टाने वाझे यांच्या कोठडीत नऊ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. या दरम्यान वाजे यांचे बंधू सुधर्म माध्यमांशी बोलताना म्हणाले की" एनआयए आणि कोर्टावर आमचा पूर्ण विश्वास आहे, न्यायालय योग्य तो न्याय करेल"
आज सचिन वाझे यांच्या अँजिओप्लास्टी करण्याचा अर्ज एनआयए कोर्टात त्यांचा भाऊ सुधर्म वाझे यांनी दिला. कोर्टाने म्हटले की, वाझे यांची तब्येत पाहता त्यांना संपूर्ण वैद्यकीय मदत देण्यात यावी. मागील सुनावणीत एनआयए कोर्टाने वाझे यांचा भाऊ सुधर्म यांचा अर्ज स्वीकारला आणि त्यांना भेटण्याची परवानगी दिली. सुधर्म यांनी आपला भाऊ सचिन वाझे यांना भेटण्यासाठी कोर्टाकडून पाच मिनिटांची वेळ मागितली होती. मुंबई पोलिसांचे निलंबित सहाय्यक निरीक्षक सचिन वाझे हे बहुचर्चित अॅन्टिलिया आणि मनसुख हिरेन मर्डर प्रकरणातील आरोपी आहेत.
'माझा एनआयए आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास - सुधर्म वाझे
आज सचिन वाझे यांच्या अँजिओप्लास्टी करण्याचा अर्ज एनआयए कोर्टात त्यांचा भाऊ सुधर्म वाझे यांनी दिला. कोर्टाने म्हटले की, वाझे यांची तब्येत पाहता त्यांना संपूर्ण वैद्यकीय मदत देण्यात यावी. मागील सुनावणीत एनआयए कोर्टाने वाझे यांचा भाऊ सुधर्म यांचा अर्ज स्वीकारला आणि त्यांना भेटण्याची परवानगी दिली.
अलिकडे देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती. जी मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. या घटनेनंतर मनसुखचा मृतदेह मुंबईतील निर्जन जागी सापडला. हे प्रकरण सचिन वाझे यांच्याशी संबंधित आहे. एनआयएने मुंबईतील मिठी नदीतून गाडीच्या लॅपटॉप व नंबर प्लेट्स जप्त केल्या आहेत. एका अनोळखी व्यक्तीचा पासपोर्टही वाझेंच्या घरी सापडला आहे. त्यामुळे त्यादृष्टीनेही तपास आवश्यक असल्याची ग्वाही एनआयएने विशेष कोर्टात दिली.
सचिन वाझेंवर लावलेल्या आरोपांशी संबंधित 120 TB चे सीसीटिव्ही फुटेज हस्तगत करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत सचीन वाझे कुठे गेला?, कुणाला भेटला?, का भेटला?, स्फोटकांचे सामान कसं गोळा केलं?, मिठी नदीतून सापडलेल्या गोष्टींतून डेटा रिकव्हर करायचा आहे, अशी माहिती कोर्टाला देण्यात आली.