महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अँटिलिया प्रकरण: सचिन वझेंना 'एनआयए'कडून अटक, आज कोर्टात हजर करणार - Mansukh Hiren murder case

तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर सचिन वझेंना एनआयएने अटक केली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानासमोर स्फोटकांसह सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात ही महत्वाची अटक मानली जात आहे.

sachin-waze-arrested-by-nia-in-mansukh-hiren-murder-case
सचिन वझे एनआयए'ने केली अटक

By

Published : Mar 14, 2021, 12:25 AM IST

Updated : Mar 14, 2021, 10:48 AM IST

मुंबई -अँटिलिया प्रकरणी तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर शनिवारी रात्री उशीरा सचिन वझेंना एनआयएने अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. तसेच त्यांच्या रिमांडसाठी न्यायालयातर्फे अर्ज केला जाण्याचीही शक्यता आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानासमोर स्फोटकांसह सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात ही महत्त्वाची अटक मानली जात आहे. जी गाडी अंबानी यांच्या घराबाहेर सापडली. तिचे मालक मनसुख हिरेन यांना वझे हे आधीपासून ओळखत होते. संबधित गाडी ही वझे यांच्याजवळ होती, असे आरोप वझेंवर होते.

शनिवारी वझेंची 13 तास चौकशी -

एनआयएकडून सचिन वझे यांची शनिवारी दिवसभर कसून चौकशी करण्यात आली. कंबाला हिल येथील एनआयए कार्यालयात सचिन वझे सकाळी ११.३० च्या सुमारास गेले होते. तिथे तब्बल १३ तास चौकशी केल्यानंतर रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी वझे यांना अटक करण्यात आली. भारतीय दंड विधानाच्या २८६, ४६५, ४७३, ५०६ (२), १२० ब आणि ४ (अ) (ब) (इ) तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ अन्वये सचिन वझे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन वाझे अटकेची मुख्य कारणे -

एनआयएकडून सचिन वझे यांची शनिवारी 13 तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. यावेळी वझे यांनी गाडी आपणच वापरत असल्याची कबूली दिली. तसेच ते मनसुख हिरेन यांच्या संपर्कात असल्याचेही वझे यांनी कबूल केले. दरम्यान, १७ फेब्रुवारी रात्री मनसुख हिरेन यांची भेट झाली होती का, असे विचारले असता त्यांनी सचिन वाझे यांनी आरोप फेटाळले. तसेच गाडीतील स्फोटकांसदर्भात त्याबाबत आपल्याला काही माहिती नाही, अशी माहिती वझे यांनी एनआयएला दिली.

धक्कादायक बाबींचा खुलासा-

तसेच मनसुख यांची पत्नी विमला यांनी देखील गुन्हा दाखल करीत वझे हेच त्यांच्या पतीच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे याचा तपास एटीएसने करण्यास सुरुवात केली आणि वझे यांचा जबाब देखील नोंदविला. तर, अँटिलिया बाहेरील स्फोटकांचा तपास एनआयएकडे सोपविल्याने, त्यांच्या तपासात अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा झाला. त्यानंतर वझे यांना चौकशीसाठी बोलावले. त्यानुसार वझे हे सकाळी ११ वाजता एनआयएच्या चौकशीला हजर राहिले होते.

अटक पूर्व जामीनासाठी न्यायालयात केला होता अर्ज -

मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास करणाऱ्या एटीएस यंत्रणेने हत्येचा गुन्हा दाखल केल्याने अटक होण्याच्या उंबरठ्यावरील सचिन वझे यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटक पूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. या अर्जाचे परीक्षण केल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायधीश शैलेंद्र तांबे यांनी मात्र अटकपूर्व जामीन देता येणार नसल्याचे सांगितले. मुख्य संशयित असलेल्या वझे यांच्या विरोधात सबळ पुरावे असल्यामुळे सचिन वझे यांचा जामीन देता येणार नाही, असा निष्कर्षही नोंदविण्यात आला होता. यावर १९ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. याप्रकरणानंतर त्यांनी वॉट्सअॅप स्टेटस ठेवले. यामुळे एकच खळबळ माजली. तसेच एनआयए चौकशीत संशयाची सुई वझे यांच्याकडेच जात होती. तब्बल १३ तास वझे यांची चौकशी करण्यात आली.

हेही वाचा-सचिन वझेंच्या 'त्या' व्हाटसअ‌ॅप स्टेटस संदर्भात माहिती घेऊन बोलतो - गृहमंत्री अनिल देशमुख

Last Updated : Mar 14, 2021, 10:48 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details