महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सचिन वाझे आणि रियाझ काझी यांची 19 मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ - Riyajh kajhai

सचिन वाझे आणि रियाझ काझी यांची 19 मेपर्यंत मुंबईतील विशेष एनआयए कोर्टाने न्यायालयीन कोठडी वाढवली. सचिन वाझेने काही खासगी गोष्टींसाठी केलेला अर्ज कोर्टाने स्वीकारला असून वाझे यांना जीन्स, टी-शर्ट, स्पोर्ट्स शूज, वॉशिंग पावडर, साबण, मीठ, साखर, औषधं देण्यास विशेष एनआयए कोर्टाने परवानगी दिली आहे.

सचिन वाझे
सचिन वाझे

By

Published : May 7, 2021, 5:34 PM IST

मुंबई - अँटिलिया स्फोटके आणि मनसूख हिरेन हत्याकांड प्रकरणात आरोपी सचिन वाझे आणि रियाझ काझी यांची 19 मेपर्यंत मुंबईतील विशेष एनआयए कोर्टाने न्यायालयीन कोठडी वाढवली. सचिन वाझेने काही खासगी गोष्टींसाठी केलेला अर्ज कोर्टाने स्वीकारला असून वाझे यांना जीन्स, टी-शर्ट, स्पोर्ट्स शूज, वॉशिंग पावडर, साबण, मीठ, साखर, औषधं देण्यास विशेष एनआयए कोर्टाने परवानगी दिली आहे.

उद्योगपती मुकेश अंबानींच्या निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या 20 कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली एक स्कॉर्पिओ गाडी बेवारसपणे सोडण्यात आली होती. तसेच त्या गाडीचे मालक मनसूख हिरेन यांच्या अनाचक झालेल्या मृत्यूप्रकरणी पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आली होती. तसेच या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वाझेंच्या युनिटमधील एपीआय रियाझुद्दीन काझी यांनाही या प्रकरणातील पुरावे मिटवणे, प्रकरणाची माहिती असून देखील सहकार्य केल्याचा आरोप ठेवत अटक झाली आहे. 5 मे रोजी या दोघांची न्यायालयीन कोठडी संपत होती. शुक्रवारी या दोघांनाही न्यायाधीश राहुल भोसले यांच्यासमोर हजर करण्यात आले, त्यावर ह्या दोन्ही आरोपींची 19 मेपर्यंत मुंबईतील विशेष एनआयए कोर्टाने न्यायालयीन कोठडी वाढवली.

प्रकरणात अटक करण्यात आलेल्या बुकी नरेश गोरने मुंबई सत्र न्यायालयात विशेष एनआयए कोर्टात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. या गुन्ह्यांत वापरण्यात आलेली बनावट सिम कार्डही बुकी नरेश गोरनं पुरवली होती. त्याने ती कार्ड विनायक शिंदेकडे सुपूर्द केली होती. या आरोपावरून एटीएसने नरेश गोरला अटक केली त्यानंतर त्याला एनआयएकडे हस्तांतरित करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details