महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सचिन वाझे यांना 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडी

अँटिलिया या निवासस्थानाजवळील स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटकांप्रकणी अटक करण्यात आलेले सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएच्या विशेष न्यायालयाने २५ मार्च पर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.

sachin vaze remanded in nia custody
sachin vaze remanded in nia custody

By

Published : Mar 14, 2021, 8:54 PM IST

मुंबई - मुकेश अंबानी यांच्या अँटिला नामक घराच्या जवळ स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना कोर्टाने 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडी दिली आहे. शनिवारी रात्री उशिरा सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली होती.

१० दिवसांची एनआयए कोठडी -

एनआयएने कोर्टाकडे 14 दिवसांची कोठडी मागितली होती. त्यानंतर कोर्टाने सचिन वाझे यांना 25 मार्चपर्यंत एनआयएच्या ताब्यात पाठविले. एनआयएने कोर्टात सांगितले की, हे एक मोठे षडयंत्र आहे, ज्यामध्ये अनेक लोकांचा सहभाग असल्याचा संशय आहे. एनआयएने सचिन वाजे यांना ज्यांचे नाव पुढे येत आहे, अशा प्रत्येक व्यक्तीबरोबर समोरासमोर उभे केले पाहिजे. एनआयएने कोर्टासमोर अतिशय महत्वाचे पुरावे सादर केले. ज्या आधारे वाझे यांना अटक केली गेली.

हे ही वाचा - विरारचा हार्दीक पाटील ठरला आर्यमॅन; १६ वेळा स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय

एनआयएने सांगितले की, सचिन वाझे यांना 25 फेब्रुवारी रोजी स्फोटकांनी भरलेले वाहन उभारण्यात आणि त्यामध्ये सामील होण्यास भूमिका बजावल्याबद्दल अटक करण्यात आली होती. 25 फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या घरासमोर पार्क केलेल्या स्कॉर्पिओ कारमध्ये जिलॅटिनच्या कांड्या आणि धमकी देणारे पत्र सापडले होते. एनआयएने म्हटले आहे की, स्फोटकांनी भरलेले वाहन तयार करण्यात आणि त्यात सामील होण्यात भूमिका बजावल्याबद्दल वाझे यांना अटक करण्यात आली होती.

हे ही वाचा - मोदी-शाह यांचे सरकार ईडी आणि सीबीआयवर टिकून - भालचंद्र मुणगेकर

शनिवारी वाझे यांचे निवेदन नोंदवताना एनआयएने गुन्हे शाखेचे एसीपी नितीन अलकनुरे आणि एटीएसचे एसीपी श्रीपाद काळे यांना एसयूव्ही मिळवण्यासाठी आणि हिरेनच्या कथित हत्येप्रकरणी आतापर्यंत केलेल्या चौकशीची माहिती सामायिक करण्यासाठी समन्स बजावले होते. अलाकनुरे आणि काळे यांनी सुमारे चार तासानंतर एनआयए कार्यालय सोडले. मनसुख हिरेन याच्या पत्नीने वाझेवर पतीच्या संशयित मृत्यू प्रकरणात सामील असल्याचा आरोप केला आहे. या आठवड्यात वाझे यांना मुंबई गुन्हे शाखेतून काढून टाकण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details