मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जामध्ये निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे ( Suspended police officer Sachin Waze ) आणि माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग ( Former Police Commissioner Paramveer Singh ) यांनी सीबीआय आणि निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल आयोग यांच्यासमोर दिलेल्या वेगवेगळ्या जबाबाचा आधार घेत असे म्हटले आहे की, दोन्हीही व्यक्तींनी स्वतःला वाचवण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Former Home Minister Anil Deshmukh ) यांना फसवण्याचा प्रयत्न केला आहे. या अर्जावर 14 सप्टेंबर रोजी उत्तर सादर करण्याचे निर्देश विशेष सीबीआय कोर्टाने सीबीआयला दिले आहे. ( Central Investigation Department )
विधानांमध्ये विरोधाभास असल्याचे जामीन अर्जामध्ये म्हटले : देशमुख यांनी सिंग आणि वाझे यांनी सीबीआयला दिलेल्या जबाबात आणि माजी मंत्र्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या निवृत्त न्यायमूर्ती के यू चांदीवाल आयोगासमोर नोंदवलेल्या विधानांमध्ये विरोधाभास असल्याचे जामीन अर्जामध्ये म्हटले आहे.
ओळखपत्रांवर प्रश्नचिन्ह उपस्थित : केंद्रीय अन्वेषण विभागाने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात जामीन मागताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या ओळखपत्रांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विशेष न्यायालयाने केंद्रीय एजन्सीला 14 ऑक्टोबरपर्यंत याचिकेवर उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे.
न्यायालयाला दिलेल्या अर्जात देशमुख यांनी दावा केला की : गुरुवारी विशेष सीबीआय न्यायालयाला दिलेल्या अर्जात देशमुख यांनी दावा केला की, त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप हे केवळ तपास यंत्रणांच्या लहरीपणा आणि कल्पनांवर आधारित आहेत. यामुळे ज्या विधानांवर सीबीआयने हे संपूर्ण प्रकरण घडवले त्यावरही आता प्रश्नचिन्ह होत आहे.