महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sachin Tendulkar meet Raj Thackeray : सचिन तेंडुलकर 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंची घेतली भेट - सचिन तेंडुलकर लेटेस्ट न्यूज

सचिन तेंडुलकर(Sachin Tendulkar) याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे(MNS Chief Raj Thackeray) यांच्या 'शिवतीर्थ'(Shivtirth) या नव्या घरी सदिच्छा भेट दिली. तसेच राज ठाकरे यांच्यासोबत अनेकवेळ चर्चाही केली.

Sachin Tendulkar meet Raj Thackeray
सचिन तेंडुलकरने घेतली राज ठाकरेंची भेट

By

Published : Nov 22, 2021, 4:36 PM IST

Updated : Nov 22, 2021, 5:00 PM IST

मुंबई -मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर(Sachin Tendulkar) याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे(MNS Chief Raj Thackeray) यांच्या 'शिवतीर्थ'(Shivtirth) या नव्या घरी सदिच्छा भेट दिली. राज हे पूर्वी कृष्णकुंजवर राहत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वीच ते शिवतीर्थ या नव्या निवासस्थानी राहण्यासाठी आले आहेत. त्यांच्या नव्या घराला भेट देण्यासाठी सचिन तेंडुलकर शिवतीर्थवर पोहोचला होता.

सचिन तेंडुलकरने घेतली राज ठाकरेंची 'शिवतीर्थ'वर भेट
  • सचिन तेंडुलकर 'शिवतीर्थ'वर -

यावेळी राज आणि सचिन तेंडुलकर गॅलरीमध्ये उभे असताना अनेकांनी त्यांचे फोटो, व्हिडिओ काढले आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भेटीचा नेमका उद्देश काय, याबद्दल माहिती मिळालेली नसली तरीही सचिनने राज यांच्या नव्या घराला सदिच्छा भेट दिल्याचे सांगितले जात आहे.

  • राज ठाकरे यांचे नवे घर शिवतीर्थ -

राज यांनी दिवाळीत शिवतीर्थ या नव्या घरात प्रवेश केला. नव्या घराला एकूण 5 मजले आहेत. चित्रपटांचे प्रचंड शौकीन असलेल्या राज ठाकरेंच्या या घरात होम थिएटर आहे. घराचा दर्शनी भाग शिवाजी पार्कच्या दिशेने आहे. घरासाठी परदेशातून फर्निचर मागवले होते. घराचे संपूर्ण डिझाईन राज यांनी स्वत: लक्ष घालून तयार करून घेतले आहे. घराचे सगळे फर्निचर, वस्तू त्यांनी स्वत: डिझाईन केल्या आहेत. काही फर्निचर मात्र परदेशातून तर काही भारतातील कारागिरांकडून तयार करून घेतले आहे. या घरात सर्व सोयीसुविधांनी युक्त असे एक भव्य ग्रंथालय देखील उभारण्यात आले आहे.

Last Updated : Nov 22, 2021, 5:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details