मुंबई - गेल्या वर्षभरापासून महाविकास आघाडी कोरोना विरोधात लढा देत आहे. महाविकास आघाडीला करोनाबाबत भाजपकडून उपदेशाची आवश्यकता नाही, अशा शब्दात काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला खडसावले. आम्ही करोनाच्या संकटात कार्यक्षमतेने काम करत आहोत. करोना हाताळण्यापेक्षा निवडणुकीत मग्न राहणाऱ्या आणि जनतेला मदत करण्याऐवजी सेंट्रल व्हिस्टात स्वतःसाठी अलिशान महाल उभारणाऱ्या मोदीजींना या उपदेशाची गरज असल्याचा टोला भाजपला लगावला.
उपदेशाची गरज पंतप्रधान मोदींना, महाविकास आघाडी सरकारला उपदेश करू नये - सचिन सावंत
उपदेशाची गरज पंतप्रधान मोदींना असून महाविकास आघाडी सरकारला उपदेश करू नये, असे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला खडसावले आहे. कॉंग्रेस प्रवक्ते सावंत यांनी भाजपला ट्विटरवरुन प्रतिउत्तर दिले आहे.
उपदेशाची गरज पंतप्रधान मोदींना! महाविकास आघाडी सरकारला उपदेश करु नये; सचिन सावंत खडसावले
'राज्याचा खर्च वाढतोय'
राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवरुन भाजपकडून महाविकास आघाडीवर चौफेर टीका सुरु आहे. आता नरिमन पॉईंट येथील मनोरा आमदार निवास पुनर्विकासावरुन भाजपने राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) यासाठी मंगळवारी ९०० कोटी रुपयांची निविदा मागवली. सत्ताधारी पक्षावर राज्याचा खर्च वाढत असल्याचा आरोप भाजपने केला. कॉंग्रेस प्रवक्ते सावंत यांनी भाजपला ट्विटरवरुन प्रतिउत्तर दिले.