मुंबई-मनसेचे अध्यक्षराज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंगे यांच्याविरोधातील आंदोलनामुळे हिंदू सण आणि मंदिरांवर ही संक्रात आली आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत ( Congress spokesperson Sachin Sawant ) यांनी केला आहे. राज्यातील मशीन अनधिकृत असल्याची ( Raj Thackerays mosque statement ) ओरड करताना ४७ टक्के मंदिरेही अनधिकृत आहेत, याकडे काँग्रेसचे प्रवक्ते सावंत यांनी लक्ष वेधले.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे यांच्या विरोधातील आंदोलन छेडल्यानंतर अनेक मशिदिंमधील सकाळची आजान ( pray in mosque ) बंद झालेली आहे. परंतु त्याचसोबत हिंदू देवस्थानमधील काकड आरती सुद्धा ( worship in temple ) बंद झाली आहे हे पाप कुणाचे असा सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ( Sachin Sawant slammed Raj Thackeray ) केला आहे. आता मंदिरसोबत, गुरुद्वारा आणि बौद्ध विहारमधील भोंगे काढण्यात येतील. तसेच हिंदु सणांच्या संदर्भातही अनेक बंधने आता येतील. सर्व धर्मीयांच्या उत्सवावर आलेली संक्रात ही राज ठाकरे यांच्यामुळे आली आहे, असा आरोपही त्यांनी केला.
अनधिकृत मंदिरांची संख्या अधिक- राज्यामध्ये असलेल्या मशिदी अनधिकृत असल्याची ओरड राज ठाकरे यांनी केली आहे. राज्यात जण १५००० मशिदी असतील तर ८० हजांराहून अधिक मंदिरे आहेत. यातील ४७ टक्के मंदिरे ही अनधिकृत आहेत, असा दावा सचिन सावंत यांनी केला आहे. त्यामुळे इतरांकडे बोट दाखवताना आधी संपूर्ण परिस्थितीची माहिती घ्यावी असेही सावंत म्हणाले. राज ठाकरे हा न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देतात. मात्र न्यायालयानेही रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत डेसिबल वर नियंत्रण ठेवावे असे म्हटले आहे.
मंदिरांकडे अधिकृत परवानगी नाही- मुंबईत २४०४ मंदिरे आणि १११४ मशिदी आहेत. यापैकी ९२२ मशीदीकडे अधिकृत परवानगी आहे. तर केवळ वीस मंदिरांकडे अधिकृत परवानगी आहे. ५ मंदिरांचे आणि १५ मशिदींचे अर्ज परवानगीसाठी प्रलंबित आहेत. राज ठाकरे यांचे म्हणणे ऐकल्यास सर्व मशीदींसोबत मुंबईतील २४०० मंदिरांना ही आपले भोंगे काढावे लागणार आहेत असा दावा सावंत यांनी केला.