मुंबई - शिवसेनेत (Shivsena) येण्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुखांनी तुमचे राजकीय भवितव्य बघू असाच शब्द मला दिला होता. तो मी घेतला. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही, एक सामान्य शिवसैनिक म्हणून काम करतोय. जे जबाबदारी देतील, ती प्रामाणिकपणे पार पाडेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना उपनेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना दिली.
Sachin Ahir : मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही - सचिन अहिर - विधानपरिषद निवडणुकीसाठी सचिन अहिर नाव चर्चेत
मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही, एक सामान्य शिवसैनिक म्हणून काम करतोय. जे जबाबदारी देतील, ती प्रामाणिकपणे पार पाडेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना उपनेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना दिली.
राज्य विधानपरिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी येत्या 20 जूनला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दोन नाव पुढे आली आहेत. वरळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना नेते सचिन अहिर यांच्या नावाची चर्चा आहे. शिवसेनेचे उपनेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा निवडणुकीतून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्यावेळी अहिर यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता.
मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी काय शब्द दिला होता, असा प्रश्न विचारला असता, तुमचे राजकीय भवितव्य बघू असा शब्द उद्धव ठाकरे यांनी दिला होता आणि तो मी घेतला. मात्र, एक सामान्य शिवसैनिक म्हणून काम करत आहे. कोणत्याही पदाची मला अपेक्षा नाही, प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे अहिर म्हणाले. राज्य विधिमंडळात मंत्री म्हणून अनेक खात्यांचा पदभार पाहिला आहे. सर्व प्रश्नांची जाण आहे. अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबाबत अंतिम निर्णय घेतील, असे अहिर म्हणाले.