महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

छातीत राम आहे तर बडवता कशाला, चंद्रकांत पाटलांवर सेनेचा निशाणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली होती.' शिवसेनेला अयोध्येत जाऊन रामाशी नाते आहे हे दाखवावे लागते. मात्र, आमची छाती फाडली तरी रामच दिसेल' असे वक्तव्य पाटील यांनी केले होते.

Saamana editorial
सामना संपादकीय चंद्रकांत पाटलांवर टीका

By

Published : Mar 9, 2020, 8:05 AM IST

मुंबई - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चांदमियां पाटील यांच्या छातीची तातडीने तपासणी करण्यात यावी, ते म्हणाले, 'माझी छाती फाडली तरी त्यात श्रीराम दिसेल' चांदमियांनी त्यांची छाती फाडण्याची गरज नाही. त्यांच्या छातीत हिंदुत्वाच्या बाबतीत किती काळेकुट्ट विष ठासून भरले आहे, याचा अनुभव शंभर दिवसांपुर्वी महाराष्ट्राने घेतला आहे, या शब्दात सामनातून चंद्रकांत पाटलांवर टीका करण्यात आली आहे. तुमच्या छातीत खरेच राम असेल तर छात्या बडवणे बंद करा, श्रीरामा त्रास होईल असेही सेनेने म्हटले आहे.

हेही वाचा...राममंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेकडून १ कोटी रुपये; मुख्यमंत्र्यांची अयोध्येत घोषणा

राज्यातील महाविकासआघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाले. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर गेले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली. 'शिवसेनेला अयोध्येत जाऊन रामाशी नाते आहे, हे दाखवावे लागते. मात्र, आमची छाती फाडली तरी रामच दिसेल' असे वक्तव्य पाटील यांनी केले होते. पाटील यांच्या वक्तव्याचा आणि टीकेचा समाचार सामनातून घेतला आहे.

हेही वाचा...राम मंदिरासाठी फक्त १ कोटी आणि मुलाच्या पेंग्विन हट्टासाठी ४५ कोटी?

राम समजायला सत्यवचन आणि माणुसकी समजुन घ्यावी लागते...

चंद्रकांत पाटील यांच्या छातीत हिंदुत्वाच्या बाबतीत काळेकुट्ट विष ठासून भरले आहे, त्याचा अनुभव शंभर दिवसांपुर्वी महाराष्ट्राने घेतला आहे. राम समजायला सत्यचन व माणुसकी समजुन घ्यावी लागते. राज्यातील विरोधकांकडे त्याची वानवा आहे. म्हणूनच 'ठाकरे सरकार'च्या अयोध्यावारीवर ते छात्या बडवीत आहे, अशी टीका सामनातून पाटील यांच्यावर करण्यात आली आहे. तसेच तुमच्या छातीत खरंच राम असेल तर छात्या बडवणे बंद करा. श्रीरामाला त्रास होईल, असेही म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details