महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अश्विनीकुमार मृत्यू प्रकरण : काळ मोठा कठीण आला आहे... सामनातून 'रहस्यमय मृत्यू'चा उल्लेख - saamana on ashwinikumar death

सीबीआयचे माजी संचालक अश्विनीकुमार यांच्या मृत्यूबाबत शिवसेनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हा मृत्यू रहस्यमय असल्याचा उल्लेख सामनाच्या अग्रलेखात आहे. त्यामुळे विविध स्तरांतून अश्विनीकुमार यांच्या मृत्यूविषयी तर्क लावले जात आहेत.

सामना अग्रलेख
शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तून सीबीआयचे माजी संचालक अश्विनीकुमार यांच्या मृत्यूबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

By

Published : Oct 9, 2020, 12:35 PM IST

Updated : Oct 9, 2020, 2:05 PM IST

मुंबई - सीबीआयचे माजी संचालक अश्विनीकुमार यांच्या मृत्यूबाबत शिवसेनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हा मृत्यू रहस्यमय असल्याचा उल्लेख शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात आहे.

सध्या देशातील वातावरण आत्महत्या, बलात्कारासारख्या प्रकरणांनी गढूळ झालेले असताना अश्विनीकुमार यांच्या आत्महत्येने सीबीआयने पापण्यांची तरी उघडझाप करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या देशात नक्की काय चालले आहे, तेच कळायला मार्ग नाही. सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केली, असे वैद्यकीय पुरावे येऊनही ते मानायला काही लोक तयार नाहीत. हाथरसची तरुणी मराणाच्या दारातून सांगतेय, माझ्यावर बलात्कार झाला, त्यावर सरकार विश्वास ठेवायला तयार नाही. आता सीबीआयचे माजी संचालक अश्विनीकुमार यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळाला. ते का मेले, याचे रहस्य शोधण्यात कोणालाच रस नाही. काळ मोठा कठीण आला आहे, असे भाष्य 'सामना'तून करण्यात आले आहे.

कंगनाला टोला...?

सीबीआयच्या प्रमुख संचालकपदी काम केलेली व्यक्ती नैराश्याने ग्रासते, जगण्यासारखे काही उरले नाही, आयुष्याचाच कंटाळा आलाय म्हणून आत्महत्या करते; यावर आपण सगळे डोळे मिटून विश्वास ठेवतो, हे काही पटत नाही. अश्विनीकुमार हे फक्त सीबीआयचे संचालक नव्हते, ते मणिपूर आणि नागालँडचे राज्यपालही होते. ते हिमाचलचे पोलीस महासंचालक होते. म्हणजे ते मनाने आणि शरीरारने खंबीर होते, म्हणूनच त्यांच्यावर सरकारने विशेष जबाबदाऱ्या सोपवल्या. अशा व्यक्ती अचानक आत्महत्या करते व त्यावर कोणी प्रश्नचिन्ह निर्माण करत नाही, याचे आश्चर्य वाटले. अश्विनीकुमार यांना खरंच आयुष्याचा कंटाळा आला की, त्यांच्यावर कोणाचा दबाव होता, यावर सध्या हिमाचलात वास्तव्यास असलेल्या 'नटी'ने भाष्य केले पाहिजे. हिमाचलच्या एका नटीने सुशांतचे आत्महत्या प्रकरण लावून धरले. पण त्याच नटीच्या हिमाचलमध्ये सीबीआयच्या माजी संचालकांनी आत्महत्या केली, यावर कुणी उसासाही सोडू नये? असा प्रश्न या अग्रलेखात विचारण्यात आला आहे.

सुशांतसिंह प्रकरणात ज्यांनी आत्महत्या नसून हत्या असल्याचे सिद्ध करण्यासाठी जीवाचा आटापिटा केला, त्यांना सीबीआयचे माजी संचालक अश्विनीकुमार यांच्या आत्महत्येमागे काहीतरी रहस्य आहे, कारस्थान वाटू नये, हे गौडबंगाल आहे, असे म्हणत शिवसेनेने अश्विनीकुमारांच्या आत्महत्येवर संशय व्यक्त केला आहे.

Last Updated : Oct 9, 2020, 2:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details