मुंबई - मृत महिलेची बहीण करूणाने जबाबात पोलिसांना सांगितले की, माझी बहीण रूपाली चंदनशिवे हिने इकबाल शेख याच्यासोबत गेल्या तीन वर्षांपूर्वी प्रेम विवाह केला होता. इकबालने तिचे नाव जारा असे ठेवले होते. त्यांना अली नावाचा दोन वर्षाचा मुलगा आहे. सुरुवातीस ते एकत्र राहत होते. इकबालचे पहिले एक लग्न झाले होते. इकबाल आणि त्याचे आई-वडील हे जाराला मुस्लिम धर्माप्रमाणे पेहराव करण्यासाठी आणि मुस्लिम रीतीरीवाजाप्रमाणे वागण्यासाठी दबाव टाकत होते. तसेच, घरामध्ये हिंदीमध्ये बोलण्यास सांगत होते. त्या कारणावरून इकबाल आणि जारामध्ये नेहमी भांडण होत असे.
गेल्या सहा महिन्यांपासून जारा व मुलगा अली हे इकबालपासून वेगळे राहावयास लागले होते. जारा आणि इकबाल हे फोनवर देखील एकमेकांशी नेहमी भांडत असायचे. तेव्हा इकबालच्या आई वडिलांनी इकबालला जारापासून सोडचिट्टी घेण्यास सांगत होते. जाराही इकबालपासून वेगळी राहत होती. जारा ही सुरुवातीस दादर येथील हॉस्टेलमध्ये राहत होती. गेल्या दोन महिन्यांपासून ती तिच्या काजल चौधरी आणि जानवी शर्मा या मैत्रिणींसोबत भाडेतत्त्वावर चेंबूर येथील मोतीलाल रहिवाशी संघ येथे राहत होती.