महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Bala Nandgaonkar leave MNS? : बाळा नांदगावकर मनसे सोडणार का? खुलासा करत म्हणाले..

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) यांनी पक्ष बांधणीसाठी राज्याचे दौरे सुरु केले असतांना मनसेला गळती लागण्यास सुरुवात झाली आहे. पुण्यातील मनसेच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील ( Rupali Thombare Patil Leaves MNS ) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता राज यांचे विश्वासू बाळा नांदगावकर हेही मनसे सोडणार ( Bala Nandgaonkar leave MNS ) असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. या पार्श्वभूमीवर नांदगावकर यांनी स्वतः याबाबत खुलासा केला आहे.

बाळा नांदगावकर
बाळा नांदगावकर

By

Published : Dec 16, 2021, 5:09 PM IST

मुंबई - राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) यांचे राज्यातील दौरे देखील निश्चित झाले आहेत. मात्र अशातच पक्षाला पुन्हा गळती लागली आहे. मनसेच्या आघाडीच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली ( Rupali Thombare Patil Leaves MNS ) आहे. यानंतर राज यांची सावली समजले जाणारे बाळा नांदगावकर हे देखील मनसे सोडणार ( Bala Nandgaonkar leave MNS ) सोशल मीडियावर पसरली होती. मात्र या वर नांदगावकर यांनी खुलासा करत असा कोणताही विचार नसल्याचे सांगितले आहे.


शिवसेनेत जाणार असल्याचा मेसेज
'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले बाळा नांदगावकर हे पक्ष सोडून शिवसेनेत जाणार', असा मेसेज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मोठ्या प्रमाणात अफवा पसरल्यामुळे स्वतः बाळा नांदगावकर यांना याबाबत खुलासा करावा लागला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुणे दौरा ( Raj Thackeray In Pune ) सुरू आहे. या दौऱ्याला गेल्या नसल्यामुळे मी स्वगृही परतणार अशा बातम्या आणि काही मेसेज फिरत आहेत असे नांदगावकर यांनी सांगितले आहे.

दौऱ्याला नसल्याने मेसेज फिरले
नाशिक आणि औरंगाबाद येथे झालेल्या बैठकांमध्ये मी स्वतः होतो. जेव्हा पुन्हा दौरा जोरात सुरू झाला तेव्हा मी मुंबईला परतलो. कारण माझ्या मतदारसंघात 18 तारखेला कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. मी पुण्याच्या दौऱ्याला गेलो नसल्याने, 'बाळा नांदगावकर स्वगृही परतणार अशा बातम्या आणि काही मेसेज फिरत आहेत', अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details