महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश उत्सवासाठी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीकडून नियमावली जाहीर - mumbai public Ganesh festival Rules

कोरोनाचे संकट पाहता यावर्षीचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने घेतला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर यांनी याबाबत माहिती दिली.

mumbai Public Ganeshotsav
मुंबई सार्वजिनक गणेशोत्सव

By

Published : May 11, 2020, 10:06 AM IST

मुंबई - कोरोनाचे संकट पाहता यावर्षीचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने घेतला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर यांनी याबाबत माहिती दिली. त्यामुळे ऐनवेळी होणारी धावपळ टाळणे आणि सुरक्षित उत्सवाच्या तयारीसाठी शासनाने लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर यांनी दिली नियमावलीची माहिती...

हेही वाचा...ईटीव्ही भारतच्या पाठपुराव्यानंतर 'गणपती' उद्योजकांना शासनाचा दिलासा; कारखाने सुरू करण्यास परवानगी

सार्वजनिक गणेशोत्सवासाठीची नियमावली खालीलप्रमाणे ;

वर्गणी - मुंबईतील मोठ्या मंडळांनी (आर्थिकदृष्ट्या सक्षम) विभागीय वर्गणी घेऊ नये. मात्र, केवळ वर्गणीवर अवलंबून असलेल्या मंडळांची परंपरा खंडित होऊ नये. यासाठी संबंधीत मंडळांनी आपापल्या विभागात स्वेच्छेने वर्गणी देण्याबाबत आव्हान करणे.

श्रींची मूर्ती - कोरोनामुळे उद्भवलेली कठीण परिस्थिती पाहता सर्व मंडळांनी शक्यतो मर्यादित उंचीचा आग्रह धरावा. शक्य असल्यास शाडूच्या मूर्तीस प्राधान्य द्यावे.

मंडप/रोषणाई - मंडळांनी मंडप, रोषणाई तसेच डेकोरेशनवर होणार अतिरिक्त खर्च टाळावा. या खर्चातून आपल्या विभागात निर्जंतुकीकरण, सुरक्षित वावर नियमावलीसह शक्य तितकी कोरोना प्रतिबंधित व्यवस्था करावी.

आगमन - श्रींच्या आगमनासाठी मूर्तिकाराकडे किमान कार्यकर्त्यांसह जाणे. (मास्क आणि सॅनिटायझर जवळ बाळगणे) तसेच अतिशय साधेपणाने मूर्ती मंडपात आणणे.

श्री दर्शन - मंडपाच्या आसपास वावर असणाऱ्या व्यक्तीस (भटजी, कार्यकते इ.) हात-पाय स्वच्छ करण्यासाठी वॉश बेसिनची तसेच सुरक्षित वावर राखता येईल अशी व्यवस्था करणे.

कार्यक्रम - गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याऐवजी याववर्षी स्थानिक यंत्रणांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे.

विसर्जन - आपली सार्वजनिक मूर्ती मर्यादित उंचीची असावी. जेणेकरून मंडप परिसरात यंत्रणेच्या सहकार्याने कृत्रिम तलावाची निर्मिती करून तिथेच श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्याची व्यवस्था करावी.

ABOUT THE AUTHOR

...view details