मुंबई- रिक्षा चालकांची मुजोरी, जवळचे भाडे नाकारने, जादा प्रवासी, जलद मीटर, उद्धट वर्णन यासंबंधित दररोज यासंबंधित राज्यभरातून परिवहन विभागाला तक्रारी येतात. त्यानुसार रिक्षा चालकांच्या मुसक्या आवळण्यासाठी आरटीओने कारवाईची विशेष मोहीम सुरू केली आहे. राज्यभरात ९ हजार ५०२ रिक्षा चालकांवर परिवहन विभागाने कारवाई करत एक कोटी ६३ लाख रुपयांचा दंड आकाराला आहे. मात्र, या कारवाईचा समर्थ न करता, ज्या पद्धतीने रिक्षा चालकांवर कारवाई केली जाते. त्याच पद्धतीने भ्रष्टाचारी आरटीओतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनावर कारवाई करण्यात यावीत. कारण जे रिक्षा चालक पैसे देत नाही. त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याची प्रतिक्रिया भाजप टॅक्सी-रिक्षा सेलचे अध्यक्ष के.के. तिवारी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे.
एक कोटी ६३ लाख १० हजार रुपयांचा दंड -मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावर बेशिस्तपणे उभी केलेली जाणारी रिक्षा, गणवेश परिधान न करणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणारे अशा अनेक प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या राज्यातील रिक्षा चालकांवर परिवहन विभागाकडून कारवाईचा बडगा उभारण्यात आलेला आहे. परिवहन विभागाने (RTO) एप्रिल, २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत राज्यात तब्बल ४६ हजार ८८९ रिक्षाची तपासणी करण्यात आली असून त्यातील ९ हजार ५०२ रिक्षा चालक दोषी आढळून आले आहेत. त्यांच्यावर परिवहन विभागाने कारवाई करत एक कोटी ६३ लाख १० हजार रुपयांचा दंड आकाराला आहे.
अशी आहे आकडेवारी -परिवहन विभागाने (RTO) एप्रिल, २०२१ ते जानेवारी, २०२२ या कालावधीत राज्यात तब्बल ९ हजार ५०२ रिक्षा चालकांवर विविध कारणांसाठी कारवाई केली आहे. ज्यामध्ये जादा भाडे आकाराने ४६३, क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक करणारे २ हजार ३२५, रिक्षाचे जलद मीटर ७९, प्रवासी भाडे नाकारणारे १९७, प्रवाशांबरोबर उद्धट वर्तन करणारे ८७ आणि इतर कारणासाठी ४ हजार ७३३, असे नऊ हजार ५०५ रिक्षाचालकांवर परिवहन विभागाने कारवाई केली आहे. याशिवाय २६१ रिक्षाचालकांवर परवाना निलंबन तर ४०९ चालकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.