महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

RTO action : जादा दर आकारणाऱ्या १०३ वाहतूकदारांवर आरटीओची कारवाई, पनवेल-ठाण्यात प्रवाशांची सर्वाधिक लूट - एसटी संप

सणासुदीनिमित्त नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेरगावी जात असताना त्यांच्याकडून खासगी वाहतूकदार जादा दर आकारत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यानुसार राज्याच्या परिवहन विभागाने राज्यभर मोहिम राबवून अधिकचे दर वसूल करणाऱ्या खासगी वाहतूकदारांवर कारवाई केली आहे. यात पनवेल, ठाणे आणि अमरावती येथे सर्वाधिक दर वसूल केले जात असल्याचे समोर आले आहे. या वाहतूकदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

RTO action against 103 transporters for charging extra rates
१०३ वाहतूकदारांवर आरटीओची कारवाई

By

Published : Mar 23, 2022, 7:41 AM IST

मुंबई- प्रवाशांकडून नेमून दिलेल्या भाड्याहून अधिक तिकिट दर आकारणाऱ्या ( charging extra rates ) वाहतुकदारांवर परिवहन विभागाने कारवाई सुरु केली आहे. परिवहन विभागाच्या विविध अधिकाऱ्यांनी ( RTO ) राज्यभर ६ हजार ६१० वाहनांची झडती घेतली असता, जादा दर आकारणाऱ्या १०३ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यामध्ये पनवेल आणि ठाण्यात ( Panvel and Thane ) सर्वाधिक लुटारू वाहतुकदार असल्याचे निदर्शनास आले आहे.

अशी केली कारवाई

परिवहन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील ६ हजार ६१० वाहनांची झडती घेण्यात आली. त्यात १०३ वाहतुकदारांकडून प्रवाशांची आर्थिक लूट सुरु असल्याचे निदर्शास आले. त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. याशिवाय १ हजार ४१८ वाहनांविरोधात इतर नियमांचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. मागील पाच दिवसांत परिवहन विभागाने एकूण २२ लाख १९ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.दरम्यान, मुंबई, पश्चिम उपनगर, औरंगाबाद, नांदेड या ठिकाणी १००हून अधिक वाहनांची तपासणी केल्यानंतर एकही वाहतुकदाराने जादा दर आकारल्याचे दिसले नाही. याउलट पनवेल, ठाणे आणि अमरावती येथे जादा दरासह इतर नियमांचा भंग केलेल्या वाहनांची संख्या अधिक होती, अशी माहिती परिवहन विभागाने दिली.

हेही वाचा : Konkani Travelers Mumbai : एसटीचा संप अन् कमी रेल्वे गाड्यांमुळे कोकणातून परत येणाऱ्या प्रवाशांचे हाल..

कारवाई करण्याचे दिले होते निर्देश

होळी सणानिमित्त मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या गावी जात असतात. एसटी महामंडळाचा संप काही ठिकाणी आद्यप सुरू असल्याने खासगी बसेस प्रवाशांची अडवणूक करुन अधिक दर आकारत आहेत. अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीची परिवहनमंत्री यांनी तातडीने दखल घेवून याबाबत परिवहन आयुक्त यांनी तपास पथक नेमून कारवाई करावी, असे आदेश परिवहन मंत्री यांनी दिले होते. त्यानूसार ही कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा :Hello RTO Help Desk In Chandrapur : चंद्रपुरात उपप्रादेशिक परिवहन विभागाचा 'हॅलो आरटीओ मदत कक्ष'

ABOUT THE AUTHOR

...view details