महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 4, 2021, 4:04 PM IST

Updated : Jan 4, 2021, 4:35 PM IST

ETV Bharat / city

केंद्रासह राज्याच्या कोरोना विमापासून लाखो रुग्ण वंचित

माहितीनुसार 1 डिसेंबर 2020 पर्यंत राज्यात 18 लाख 28 हजार 286 लोकांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, राज्य सरकार व केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या विम्याचा लाभ केवळ 44 हजार 431 रुग्णांना झाल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.

आरोग्य विमा
आरोग्य विमा

मुंबई- कोरोनाबाधितांना केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य सरकारकडून महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेतून अंतर्गत विम्याचा लाभ दिला जात होता. मात्र प्रत्यक्षात केवळ ३० टक्के रुग्णांनाच विम्याची रक्कम मिळाल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे.

आरटीआय कार्यकर्ता जिंतेंद्र घाटगे यांनी कोरोनाच्या काळात रुग्णांना मिळालेल्या विमा योजनेच्या लाभाची आकडेवारी मागविली होती. मिळालेल्या माहितीनुसार 1 डिसेंबर 2020 पर्यंत राज्यात 18 लाख 28 हजार 286 लोकांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, राज्य सरकार व केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या विम्याचा लाभ केवळ 44 हजार 431 रुग्णांना झाल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. सध्याच्या घडीला राज्यात 90 हजार अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण असल्याचेही समोर आले आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारकडून कोरोना विमा कवचाच्या संदर्भात मोठे दावे जरी केले जात आहे. प्रत्यक्षात अजूनही लाखो कोरोना रुग्णांना विम्याचा लाभ मिळालेला नसल्याचा दावा आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी केला आहे.

कोरोना विमापासून लाखो रुग्ण वंचित



हेही वाचा-येत्या वर्षात आरोग्य उपाययोजनांवर लक्ष केंद्रीत करावे-उपमुख्यमंत्री अजित पवार

असे मिळाले आहे विमा कवच

आरटीआय माहिती नुसार राज्यात १ एप्रिल २०२० पासून ते ३ डिसेंबर २०२० या ८ महिन्याच्या काळामध्ये एकूण ४४,४३१ प्रकरणात ११०.७२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. परंतु त्याच काळामधील मंजूर प्रकरणांमध्ये फक्त ३० टक्के म्हणजेच १४,७७२ प्रकरणांमध्ये एकूण ३२.८३ कोटी इतकी विम्याची रक्कम संबंधित रुग्ण्यालयाला दिली आहे. तसेच ५, ५६५ कोरोना रुग्णांना विमा नाकारणे व प्रलबंति ठेवण्याचा अनुभव आला आहे.

हेही वाचा-मुंबईत आज 581 जणांना कोरोना, 3 जणांचा मृत्यू

रेशन कार्डधारकांना दिलासा नाही-

राज्यभरात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ७,६३३ रुग्णांना कोरोना विमा योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यानंतर ठाणे जिल्ह्यात ४,१६६ तर सातारा जिल्ह्यात २,९४८ रुग्णांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण असलेल्या मुंबईत सर्वाधिक कमी १, ९९३ रुग्णांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. सरकारमार्फत अशी घोषणा करण्यात आली होती की सगळ्या प्रकारच्या रेशन कार्डधारकांना विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे. पण मुळात केशरी रंगाच्या 32, 662 रेशन कार्डधारकांना विमा योजनेचा लाभ मिळाला आहे. तर ६,३६२ पिवळे रेशन कार्ड आणि ४,९५२ पांढरे रेशन कार्डधारकांना याचा लाभ मिळालेला आहे.

राज्यातील सर्व रुग्णालयात योजना उपलब्ध नसल्याचा दावा-

केंद्र सरकार व राज्य सरकारची ही योजना राज्यातील सगळ्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध नाही, असा दावा आरटीआय कार्यक्रते जितेंद्र घाटगे यांनी केला आहे. ही विमा योजना फक्त सरकारच्या नेटवर्क रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. केवळ नफा कमविण्यासाठी अनेक खासगी रुग्णालये ही योजना राबवण्यात टाळाटाळ करत आहेत. एखादा कोरोनाबाधित रुग्ण या योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क करत असेल तेव्हाही त्यांना मदत केली जात नाही. अशा स्थितीत या योजनेचा म्हणावा तितका फायदा गरजू रुग्णांपर्यंत पोहोचत नसल्याचे आरटीआय कार्यरकर्ते घाडगे यांनी सांगितले.

राज्यात कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण ओसरले!

दरम्यान, मार्चपासून कोरोना महामारीचा देशभरासह राज्यात उद्रेक झाला होता. गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या नव्या रुग्णांचे प्रमाण कमी आढळत आहे. असे असले तरी कोरोनाच्या नवीन प्रकारच्या विषाणुचा धोका लक्षात राज्यात रात्री ११ ते सकाळी ६ संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रविवारी मुंबईत 581 नवे रुग्ण आढळून आले असून, 3 रुग्णांचा मृत्यू झाला.

Last Updated : Jan 4, 2021, 4:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details