महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Fire Brigade Information In RTI : अग्निशमन दलाची माहिती देण्यास टाळाटाळ; आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांचा खुलासा

मुंबईत नेहमीच आगीच्या घटना घडतात. या आगीमध्ये नागरिक जखमी होतो. (RTI activist Anil Galgal) अनेकांचा जीवही जातो. (fire brigade In Mumbai) नागरिकांचा जीव गेल्यावर फायर ऑडिट झाले नसल्याचे समोर येते. यासाठी फायर ऑडिट झालेल्या इमारतीची माहिती मागितली असता सरळ आणि स्पष्ट माहिती देण्यास अग्निशमन दलाने टाळाटाळ केली आहे. ( Fire Fighting System ) अशी (Fire Brigade Information In RTI) खंत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी व्यक्त केली.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली

By

Published : Jan 23, 2022, 7:20 AM IST

मुंबई - मुंबईत नेहमीच आगीच्या घटना घडतात. या आगीमध्ये नागरिक जखमी होतो. अनेकांचा जीवही जातो. नागरिकांचा जीव गेल्यावर फायर ऑडिट झाले नसल्याचे समोर येते. यासाठी फायर ऑडिट झालेल्या इमारतीची माहिती मागितली असता सरळ आणि स्पष्ट माहिती देण्यास अग्निशमन दलाने टाळाटाळ केली आहे. (BMC Commissioner Iqbal Singh Chahal) 32 महिन्यापूर्वी तक्रारींवर कारवाई करत उपाययोजना केल्या असत्या तर अशा दुर्घटनेत मनुष्यहानी आणि वित्त हानी होण्यापासून वाचवू शकलो असतो, अशी खंत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी व्यक्त केली.

काल (दि. 22 जानेवारी)रोजी ताडदेव परिसरातील भाटिया रुग्णालय जवळ कमला इमारतीमध्ये १८ व्या मजल्यावर आग लाल्याची घटना घडली. या आगीत 6 जणांचा मृत्यू झाला तर २९ जण जखमी (Tardeo Fire Mishap) झाले. ( Tardeo Fire Mishap Six Death ) या दरम्यान, या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी महानगरपालिका उपायुक्त (परिमंडळ २) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत केली आहे. पंधरा दिवसात या समितीने अहवाल सादर करण्याचे निर्देश पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिले आहेत.

प्रतिक्रिया

फायर ऑडिटची माहिती नाही -

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई अग्निशमन दलाकडे मुंबई पालिकेच्या हद्दीत फायर ऑडिट अंतर्गत एकूण इमारतीची संख्या, इमारतीचा प्रकार, वॉर्डाचे नाव, एकूण फायर ऑडिट केलेल्या इमारतीची संख्या आणि फायर ऑडिट न झालेल्या इमारतीची संख्या याची माहिती दिनांक (1 जानेवारी 2018)रोजी माहिती मागितली होती. तत्कालीन विभागीय अग्निशमन अधिकारी एस. डी. सावंत यांनी जाणीवपूर्वक माहिती देण्याचे टाळले. महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक व जीवसरंक्षक उपाययोजना अधिनियम (2006) अन्वये इमारतींचे मालक, भोगवटादार, हौसिंग सोसायटी यांनी त्यांच्या इमारतीचे फायर ऑडिट परवाना धारक अग्निशमन यंत्रणा यांच्या मार्फत करुन घेणे व त्याचा अहवाल मुंबई अग्निशमन दलाच्या कार्यालयात पोच करणे किंवा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे. पण किती अहवाल प्राप्त झाले आणि कितीनी ते अपलोड केले आहे. याची माहिती दिली नाही.

फायर ऑडिटची माहिती ऑनलाईन जाहिर करा -

मुंबईतील 34 अग्निशमन केंद्राच्या हद्दीतील नामनिर्देशित अधिकारी यांना इमारतीचे तपासणी करण्याचे अधिकार देण्यात आले असून फायर ऑडिट सारखी महत्वाची माहिती अग्निशमन दल का देत नाही? असा सवाल करत अनिल गलगली यांनी अग्निशमन दलाच्या या टाळाटाळीची तक्रार पालिका आयुक्त यांस केली होती. मुंबईत जेव्हा आगीची घटना घडते तेव्हा अग्निशमन दलाने फायर ऑडिटकडे केलेले दुर्लक्षसुद्धा तेवढेच कारणीभूत असल्याची बाब निर्दशनास आल्याचे नमूद करत फायर ऑडिट सारखी महत्वाची माहिती ऑनलाईन केल्यास जे फायर ऑडिट करत नाही, त्यांना नाईलाजाने लोकलज्जास्तव पुढाकार घेत ऑडिट करावे लागेल, असेही गलगली यांनी सांगितले.

हेही वाचा -Maharashtra Tableau 2022 : यंदा राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ दाखवणार 'जैवविविधता'

ABOUT THE AUTHOR

...view details