मुंबई - आरटीई प्रवेशाची मुदतवाढ( RTE Admission Deadline Extended ) मुंबई स्तरावर 30 जुलैपर्यंत करण्यात आलेली आहे. शिक्षण अधिकार कायदाअंतर्गत 25% सामाजिक आर्थिक दुर्बल घटकातील बालकांसाठी इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश राखीव ठेवण्यात येतात. राज्यात आणि मुंबईच्या पातळीवर तिसऱ्यांदा प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. अद्यापही जेवढ्या रिक्त जागा आहेत. त्या रिक्त जागांसाठी तितक्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज प्राप्त झाले नसल्यामुळे मुंबई स्तरावर देखील आरटीची मुदत वाढ 30 जुलैपर्यंत देण्यात आलेली आहे.
39 हजार 114 जागा रिक्त -शिक्षण अधिकार कायदा 2009 अंतर्गत कलम 12 (1) सी अनुसार देशात राज्यात आणि प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विनाअनुदानित खाजगी माध्यमाच्या शाळांमध्ये 25% प्रवेश इयत्ता पहिलीसाठी राखीव ठेवण्यात येतात. या योजनेत सामाजिक आणि आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना इयत्ता पहिली मध्ये मोफत प्रवेश देण्यात येतो. शिक्षण अधिकार कायद्यानुसार पहिली ते आठवीपर्यंत मोफत सक्तीच्या शिक्षणाची तरतूद आहे. परंतु विनाअनुदानित खासगी शाळांना ( to unaided private schools ) त्यातील एकच कलम 12 एक सी हे लागू आहे आणि त्यानुसार हे 25% चे प्रवेश दरवर्षी भरले जातात. यंदा महाराष्ट्रात आर टी साठी चे प्रवेश साठी 9086 शाळा आहेत आणि या शाळांमध्ये रिक्त विद्यार्थ्यांसाठीच्या जागा एक लाख एक हजार नऊशे सहा इतके आहेत. तर राज्यभरात यासाठी अर्ज जे आलेले आहेत त्यांची संख्या दोन लाख 82 हजार 783 म्हणजेच जागेपेक्षा दुपटीने तिपटीने अर्ज प्राप्त झालेले आहे. तर या प्राप्त अर्जांमधून 1 लाख 23 हजार 951 इतक्या अर्जांची निवड झाली आहे आणि त्यापैकी केवळ 78,780 इतके विद्यार्थी पहिलीसाठी प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्यात प्राप्त ठरलेले आहेत.